Ajit Pawar, devendra fadnavis Sarkarnama
पुणे

Pune Agri Hackathon: अजित पवारांच्या नावाने दिला जाणार 'हा' पुरस्कार; मुख्यमंत्र्यांची पुण्यात घोषणा

Maharashtra agriculture News : यावेळी बोलताना कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या कार्यक्रमाची संकल्पना दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडली असल्याचं सांगितलं त्यामुळे कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांची आठवण येते असे विधान भरणे यांनी केले होते.

Sudesh Mitkar

Pune News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी पुणे दौऱ्यावर होते. त्यांनी पुण्यातील विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावली तसेच विविध विकासकामांचा लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी पुणे ॲग्री हाकेथॉन पारितोषिक वितरण समारंभाला देखील उपस्थिती लावली. त्यांच्यासोबत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे देखील उपस्थित होते.

यावेळी बोलताना कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या कार्यक्रमाची संकल्पना दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडली असल्याचं सांगितलं त्यामुळे कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांची आठवण येते असे विधान भरणे यांनी केले होते. या कार्यक्रमानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांनी माध्यमांशी संवाद साधला. फडणवीस म्हणाले, 'आज पुणे ॲग्री हॅकाथॉन या उपक्रमामध्ये कृषीच्या क्षेत्रामध्ये अतिशय सुंदर अशा प्रकारचे विविध संशोधने हे मांडण्यात आले. त्यातल्या नऊ क्षेत्रांमध्ये 18 लोकांना आम्ही पुरस्कार दिले आहेत.'

ज्यांना पुरस्कार मिळालेत त्यांचे इनोव्हेशन आम्ही इनक्युबेट करून त्याला स्टार्टअपमध्ये परिवर्तित करणार आहोत. शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल, अशा पद्धतीने आम्ही प्रयत्न करू. गेल्या वर्षीच्याही ॲग्री हॅकाथॉनमधील जे विजेते होते त्यापैकी चार प्रॉडक्ट्स आता मार्केटला आले आहेत. त्यासोबतच 12 अजून मार्केटमध्ये येण्याच्या तयारीत आहेत.

यामध्ये माती परीक्षण, कीड व्यवस्थापनापासून ते पेरणी तंत्र, कापणी तंत्रापर्यंत प्रत्येक क्षेत्रामध्ये इनोवेशन करण्यात आलेले आहे. ज्या गोष्टी आपण शेती करताना वापरतो त्या प्रत्येक गोष्टीत तंत्रज्ञानाचा उपयोग कसा करायचा? की जेणेकरून उत्पादन खर्च कमी होईल, पाणी कमीत कमी लागेल, युरिया असेल, डीएपी असेल, न्यूट्रिएंट्स असतील, या प्रत्येक गोष्टीचे प्रयोग करण्यात येत आहेत. त्यामुळे शेती क्षेत्राला याचा मोठा उपयोग होत असल्याचे देखील फडणवीस यांनी सांगितले.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण दोन घोषणा केल्या असल्याचे ते म्हणाले. त्यामध्ये हे ॲग्री हॅकाथॉन पुढील वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्राच्या स्तरावर आम्ही करणार असून त्याची घोषणा त्यांनी केली. त्यामुळे त्याला पुणे हॅकाथॉन न म्हणता 'महाराष्ट्र ॲग्री हॅकाथॉन' म्हणण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. तसेच या कार्यक्रमांमध्ये देण्यात येणारा पहिला पुरस्कार हा दरवर्षी स्वर्गीय दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नावाने देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT