Mumbai News : विधीमंडळात गेल्याच आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे. यामध्ये विविध महत्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. त्यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा त्यांनी केली. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. तर दुसरीकडे कर्जमाफीची घोषणा करण्यात आल्याने विरोधकांकडे आता विरोधासाठी प्रभावी अस्त्र राहिले नाही. त्यामुळे बुधवारी सभागृहात अर्थसंकल्पावर चर्चा सुरु आहे. या चर्चेवेळी विरोधी पक्षाच्या आमदारांनी महायुती सरकारला चांगलंच धारेवर धरले होते. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी जोरदार पलटवार केला आहे.
विधानसभेत अर्थसंकल्पावर सुरु असलेल्या चर्चेवेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेचे आमदार चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहवयास मिळाले. त्यांनी विविध प्रश्न विचारात महायुती सरकारची कोंडी केली आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी यांनी महाराष्ट्रावरील वाढत असलेल्या कर्जाचा डोंगर आणि थकबाकीवरून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलेला.
यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनी अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चेत विरोधकांच्या टीकेला तोडीस तोड प्रत्युत्तर दिले आहे. तर सुनील प्रभू यांच्याविषयी बोलताना फडणवीसांनी थेट सुनील प्रभूंच्या संपत्तीचा भरसभागृहात उल्लेख केला. यावेळी त्यांनी सुनील प्रभूंवर असलेल्या कर्जापेक्षा महाराष्ट्रावरचे कर्ज कमी असल्याचा चिमटाही फडणवीसांनी काढला. त्यामुळे सभागृहातील वातावरण चांगलेच तापले होते.
राज्याच्या कर्जावरून विरोधी पक्षाच्या आमदाराने त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला खरा, पण मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या अभ्यासपूर्ण उत्तराने चेंडू पुन्हा विरोधकांच्या कोर्टात टोलवला आहे. राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरकडे जात असताना ही 'कर्जाची' टीका म्हणजे केवळ राजकीय धूळफेक आहे का? असा सवाल करीत त्यांनी उलट विरोधकांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.
यावेळी सभागृहात फडणवीसांच्या या फटकेबाजीनंतर सत्ताधारी पक्षातील आमदारांमध्ये एकच हशा पिकला. दुसरीकडे विरोधी पक्षाच्या आमदारानी कर्ज माफीवरील चर्चेतून राज्य सरकारच्या कारभारावर टीका करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, या आमदारांच्या टीकेवर सीएम फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.