Devendra Fadnavis sarkarnama
पुणे

बोला, तुमच्या पालकमंत्र्यांशी, असे म्हणत चंद्रकांतदादांनी फडणविसांचे नाव फोडले...

Pune जिल्ह्याचे पालकमंत्री कोण होणार, याचे उत्तर चंद्रकांतदादांनी नकळतपणे देऊन टाकले

भरत पचंगे

शिक्रापूर : पुण्याचे (Pune District Guardian minister) पालकमंत्री कोण होणार, याविषयी उत्सुकता आहे. कारण पुण्यातील राजकीय केंद्रबिंदू हाच पालकमंत्री राहणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हेच पुण्याचे पालकमंत्री होतील, असे वृत्त सर्वात प्रथम `सरकारनामा`ने दिले होते. त्यावर लवकरच शिक्कामोर्तब होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री चंद्रकात पाटील हे काल शिरूर येथे माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी गेले होते. तेथून त्यांचा ताफा शिक्रापूर येथे पुणे बाजार समितीचे माजी संचालक बाळासाहेब चव्हाण यांच्या निवासस्थानी पोहचला. कालचा मंत्रीमंडळ विस्तार, शपथविधी कार्यक्रम उरकून मुंबई-पुणे-शिरुर ते शिक्रापूर असा प्रवास करुन आलेले फडणवीस दिवसभर नीटसे जेवलेले नव्हते. चव्हाण यांच्याकडे त्यांच्यासाठी मासवडी बेत करण्यात आला होता. फडणविसांनी मासवडीच्या बेतावर ताव मारला. चव्हाण परिवाराचे कौतुक करताना त्यांनी पुन्हा मासवडीसाठी उभयतां येण्याची ग्वाही दिली.

त्यानंतर त्यांना शिक्रापूरकर परिसरातील पदाधिका-यांनी गराडा घालताच वाबळेवाडी शाळेचा विषय उपस्थित झाला. यावेळी वाबळेवाडीचे वतीने सतीश वाबळे यांनी पुढे होत चंद्रकांत पाटलांना हा विषय सांगण्याचा प्रयत्न करताच त्यांनी वाबळे तसेच राजाभाऊ मांढरे यांनी सूचित केले की, `तुम्ही आता पुढे व्हा अन बोला तुमच्या पालकमंत्र्यांशी! ही सूचना ऐकून काही जणांनी चंद्रकांत पाटलांकडे चमकून पाहिले मात्र समोर थेट फडणवीसच बोलत असल्याने याबाबत चर्चा झाली नाही. मात्र ’ बोला तुमच्या पालकमंत्र्यांशी...’ म्हटल्याची चर्चा सतीश वाबळे यांनी नंतर काही मोजक्या कार्यकर्त्यांसह पत्रकारांना सांगितले. फडणवीस यांनी कार्यकर्त्यांच्या अनेक तक्रारी ऐकून म्हटले की, राष्ट्रवादीचे आता काऊंटडाऊन सुरू झालेय, असेही स्पष्टपणे म्हटल्यानेही अनेकांच्या भुवया उंचावल्या.

यावेळी सतीश वाबळे, राजाभाऊ मांढरे यांनी वाबळेवाडी शाळेला केवळ स्व.अटलविहारी वाजपेयी यांचे नाव दिल्याने ती संघाची शाळा म्हणून महाविकास आघाडी सरकारकडून टार्गेट केली गेली अन शाळा बंद करण्याचा प्रयत्न झाल्याचे सांगितले. ही माहिती सांगतानाच फडणवीस यांनी सर्वांना थांबविले अन आपल्याला या प्रकरणाची संपूर्ण माहिती असून वाबळेवाडी शाळा अन दत्तात्रय वारे गुरुजी यांचेबाबत योग्य ते न्याय देण्याबाबत मी स्वत: लक्ष देतोय, असे सांगितले.

फडणवीस यांचे औक्षण!

दिल्लीत मराठी पंतप्रधान व्हावा ही संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा आहे. मात्र आता तुमच्या रुपाने ती संधी महाराष्ट्राला आलेली आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला आता भावी पंतप्रधान म्हणून औक्षण करतोय असे म्हणत चव्हाण परिवारातील मंदाकीनी चव्हाण, किर्ती नलावडे, आरती रोडे, चित्रा मांढरे, विमल चव्हाण, वैशाली चव्हाण व नंदा चव्हाण यांनी फडणवीसांना स्मित करायला भाग पाडले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT