Sharad Pawar|धनुष्यबाण शिवसेनेचा: शिंदे गटाने वाद वाढवू नये

Sharad Pawar| Shivsena|धनुष्यबाणाबाबत काही ना काही काढून वाद वाढविण्याची भूमिका कोणी घेत असेल तर लोकच त्याला पाठिंबा देणार नाहीत.
Sharad Pawar|
Sharad Pawar|
Published on
Updated on

बारामती : धनुष्यबाण हे शिवसेनेचे चिन्ह आहे. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या आणि तेव्हापासून स्विकारलेल्या आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात असलेल्या एखाद्या राजकीय पक्षाचे चिन्ह काढून घेणे योग्य नाही, अशी भूमिका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांनी आज (१० ऑगस्ट) मांडली.

बारामतीत पत्रकारांशी बोलताना शरद पवार म्हणाले, एकनाथ शिंदे यांना दुसरा पक्ष काढायचा असेल तर ते जरुर काढू शकतात, दुसरे चिन्हही ते घेऊ शकतात, मी देखील कॉंग्रेसमधून बाहेर पडलो तेव्हा आम्ही नवीन पक्ष स्थापन केला, घड्याळ हे चिन्ह घेतले, आम्ही वाद वाढवला नाही, पण धनुष्यबाणाबाबत काही ना काही काढून वाद वाढविण्याची भूमिका कोणी घेत असेल तर लोकच त्याला पाठिंबा देणार नाहीत.

Sharad Pawar|
PMC Election : शिंदे-फडणवीस सरकारच्या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी मैदानात...

हर घर तिरंगा हा देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त हाती घेण्यात आलेला उपक्रम आहे, हा काही राजकीय कार्यक्रम नाही, देशाभिमानाची बाजू यात असल्याने आमची या उपक्रमाला साथ आहे, अशा शब्दात या उपक्रमाची पाठराखण शरद पवार यांनी केली.

लोकसभेचे अधिवेशन चालविण्याबाबतची आस्था केंद्र सरकारमध्ये गेल्या काही वर्षांपासून आहे असे आम्हाला जाणवत नाही, ज्या वेळेस सरकारला संधी मिळते तेव्हा ते अधिवेशन बंद करतात, चर्चेचा मार्ग बंद करतात, लोकांना आपली मते मांडायची संधी मिळते, ती थांबवतात आणि आपल्याला हव तस काम करतात, त्याचाच नमुना कालच लोकसभा व राज्यसभेतही पाहायला मिळाला, या शब्दात शरद पवार यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com