Junnar News
Junnar News Sarkarnama
पुणे

देवराम लांडे यांच्या नावाला काळे फासले!

दत्ता म्हसकर

जुन्नर (जि. पुणे) : जुन्नर (Junnar) तालुक्याच्या आदिवासी भागातील आपटाळे, सुराळे, निरगुडे- बेजवाट, सोमतवाडी येथील एसटी बसथांब्यावर टाकण्यात आलेल्या पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे (Devram Lande) यांच्या नावाला शनिवारी (ता. ६ ऑगस्ट) विरोधकांकडून काळे फासण्यात आले. (Devram Lande's name was blackened on the bus stop)

जुन्नर पंचायत समितीचे माजी सदस्य काळू शेळकंदे, प्रकल्प समितीचे माजी सदस्य दत्ता गवारी, आदिवासी पीपल्स फेडरेशनचे अध्यक्ष मारुती वायाळ आणि कार्यकर्त्यांनी थांब्यावरील गावचे नाव वगळून लांडे यांचे नाव व इतर मजकूरास काळा रंग फासला आहे.

आदिवासी भागातील एसटी बसथांब्याची दुरुस्ती व रंगरंगोटीचे काम पुणे जिल्हा परिषद निधीतून नुकतेच करण्यात आले होते. जिल्हा परिषद निधीतून थांब्याच्या केलेल्या कामाबद्दल देवराम लांडे यांच्या विशेष प्रयत्नातून केले असल्याचा उल्लेख करण्यात आला होता. बस थांब्यावरील गावचे नाव लहान अक्षरात, तर स्वतःचे नाव मोठ्या अक्षरात टाकल्याने हा बस थांबा की निवडणुकीच्या प्रचाराचा बोर्ड आहे, असा सवाल विरोधकांना विचारण्यात येत होता.

आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान सदस्य देवराम लांडे यांनी शासकीय पैशातून मतदारसंघ आपल्या नावाने रंगवून काढण्याचे काम सुरू केले असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. स्वतःला शेठ, आदिवासी वादळ, माजी अध्यक्ष, गोरगरिबांचा कैवारी, युवकांचे आशास्थान अशा उपमा लावण्यासही ते विसरले नसल्याचे विरोधकांनी सांगितले.

विरोधकांनी याबाबत पंचायत समिती कार्यालयाकडे विचारणा केली असता जिल्हा परिषदेच्या विकास कामांवर लोकप्रतिनिधींची नावे टाकण्याबाबत सरकारचे कोणतेही परिपत्रक नाही. विकास कामांवर लोकप्रतिनिधींची नावे टाकता येत नाहीत; परवानगी घेऊनच नावे टाकता येतात. मात्र, लांडे यांनी अशी परवानगी घेतल्याची माहिती नसल्याचे सांगण्यात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT