Prakash Ambedkar: NEET परीक्षा पेपरफुटी प्रकरणावरून देशातील राजकारण तापले असतानाच, दिल्लीतील जंतर-मंतरवर मागील २८ दिवसांपासून सुरू असलेल्या तरुणांच्या तीव्र आंदोलनामुळे अखेर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. या मोठ्या घडामोडीनंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येताना पाहायला मिळत आहेत. ठाकरे बंधूंपाठोपाठ वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी देखील याबाबत पत्रकार परिषद घेत प्रतिक्रिया दिली आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, प्रधान यांनी दिलेल्या राजीनामा पत्रात हा राजीनामा पंतप्रधानांनी मागितला आहे, असे कुठेही वक्तव्य नाहीये. हा राजीनामा असणारा धर्मेंद्र प्रधान यांनी स्वतःहून दिला आहे, असे त्यांच्या पत्रामधून भासत आहे. तसेच त्या पत्रामध्ये त्यांनी जे काही वाक्य वापरलेली आहेत. त्याच्यामध्ये या आंदोलनामध्ये अॅन्टी-सोशल एलिमेंट्स, अॅन्टी-देश एलिमेंट्स जे घुसतात आहेत त्यामुळे हा राजीनामा द्यावा लागत असल्याचं त्यांनी स्पष्ट केला आहे केलं आहे.
त्यांनी कुठेही माझ्या अकर्तृत्वामुळे २२ जणांनी आत्महत्या केली, याच्याबद्दल त्या पत्रामध्ये कुठेही खंत नाही. तसेच कुठेही पोलिसांनी केलेल्या अमानुष अत्याचाराचा, लाठीचार्जचा उल्लेख नाहीये. किंवा त्यांच्या पत्रामध्ये लाठीचार्जची चौकशी होणार, जे पोलीस दोषी आहेत त्यांच्यावरत कारवाई होणार याबाबत कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही.
त्यामुळे आता पंतप्रधान स्वतः ज्या २२ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे. त्याच्याबद्दल दुःख व्यक्त करणार का? आणि त्या विद्यार्थ्यांना नुकसान भरपाई देण्यात येणार का याचा खुलासा होणार आवश्यक आहे. विद्यार्थी संघटनांनी देखील कॉम्पेन्सेशनचा मुद्दा हा आल्याशिवाय आम्ही आमचे आंदोलन मागे घेणार नाही, असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल सरकार बोलणार नसेल, तर मग आपण आंदोलन मागे का घ्यावे? असा सवाल आंबेडकर यांनी उपस्थित केला.
या राजीनाम्यापूर्वी सरकारमध्येच कुठेतरी विचारविनिमय झालेला दिसत नाही, तर धर्मेंद्र प्रधान यांनी स्वतःहूनच राजीनामा देऊन आगीमध्ये तेल ओतण्याचे कामकाज केलं असल्याचं आंबेडकर म्हणाले. मात्र या आंदोलनात विद्यार्थी विजयी झालेत जे झुकणार नाही असे जे म्हणत होते, त्यांना पार नाक रगडायला विद्यार्थ्यांनी लावली असल्याची टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली. तसंच आंबेडकर म्हणाले की हे आंदोलन संपलेलं नसून पुढची भूमिका विद्यार्थ्यांनी जाहीर केल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचा त्यांना संपूर्ण पाठिंबा राहणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.