Dilip Walse Patil  Sarkarnama
पुणे

Dilip Walse Patil : उसाला 5 हजारांची उचल मागणाऱ्यांना वळसे पाटलांनी फटकारले : म्हणाले, ‘तुमच्या काकांनी ठेवलंय का?...कुठून देणार पाच हजार?

Sugarcane FRP Issue : दुष्काळामुळे उसाला पाच हजार रुपयांची उचल देण्याची शेतकरी संघटनांची मागणी सुरू आहे. साखर कारखान्यांच्या आर्थिक अडचणींचा उल्लेख करत माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मागणीवर कठोर टीका केली.

सरकारनामा ब्यूरो

Pune, 12 October : दुष्काळी परिस्थितीमुळे सध्या उसाला पाच हजार टन उचल देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी संघटनेकडून करण्यात येत आहे. शेतकरी संघटना त्यासाठी आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. मात्र, अडचणीत असलेल्या साखर कारखानदारीकडे बोट दाखवत कारखानदार पाच हजारांची उचल देण्यास असमर्थता दर्शवित आहेत. त्यावरून वाद रंगलेला असतानाच माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पाच हजारांची उचल मागणाऱ्यांना कठोर शब्दांत फटकारले आहे. तुमच्या काकांनी ठेवलंय का? कुठून देणार पाच हजार? असा सवाल केला आहे.

आंबेगाव तालुक्यातील पारगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या शुभारंभाच्या कार्यक्रमात माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील बोलत होते. त्यांच्या या विधानावर शेतकरी संघटनांची काय प्रतिक्रिया येतो, हे पाहणे महत्वाचे आहे.

साखर कारखानदारी अडचणीत असताना उसाला पाच हजार रुपये पहिली उचल देण्याची मागणी करणाऱ्यांनी साखर कारखाना चालवून दाखवावा, असे आव्हानही माजी मंत्री वळसे-पाटील यांनी शेतकरी संघटनेला दिले.

साखर कारखानदारींसमोर सध्या अनेक अडचणी असताना काही लोक शेतकऱ्यांचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप वळसे पाटील यांनी केला. शेतकरी संघटनेकडून उसाला पाच हजार रुपये पहिली उचल देण्याची मागणी केली जात आहे.

शेतकरी संघटेनच्या मागणीवर प्रतिक्रिया देताना, ‘तुमच्या काकांनी ठेवलंय का? एखादा कारखाना चालवायला घ्या आणि द्या पाच हजार रुपये पहिली उचल. कुठून देणार पाच हजार? कर्ज काढून कारखाना बंद पाडायचा का? असा सवाल वळसे-पाटील यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT