Someshwar Sugar Factory Result : सोमेश्वर साखर कारखाना निवडणूक : निंबूत-खंडाळा सर्वसाधारण गटातून राष्ट्रवादीचे तिघे 4500 मतांनी आघाडीवर...

NCP's Three candidates Leading 4,500 votes : सोमेश्वर कारखाना निवडणुकीत राष्ट्रवादीने ब वर्गातून विजय मिळवला. निंबूत खंडाळा गटाच्या सुरुवातीच्या मतमोजणीत तीन उमेदवार चार ते साडेचार हजार मतांनी आघाडीवर असून अंतिम निकालाची उत्सुकता वाढली आहे.
Someshwar Sugar Factory Election Result
Someshwar Sugar Factory Election ResultSarkarnama
Published on: 
Updated on: 

Pune, 12 October : श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणूक मतमोजणीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने ब वर्ग गटातून विजयाचे खाते उघडले आहे. त्यानंतर अ गटातील सर्वसाधारण गटाती 15 जागांपैकी निंबूत-खंडाळा गटातील मतमोजणीत सुरू आहे. या मतमोजणीत पहिल्याच कलात राष्ट्रवादीचे तीनही उमेदवार तब्बल 4000 ते 4500 हजार मतांनी आघाडीवर आहेत. पहिल्या टप्प्यातील आघाडी पाहता अजितदादांच्या मृत्यूनंतरच पहिलीच निवडणूक सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी एकहाती जिंकण्याचा अंदाज राजकीय तज्ज्ञांकडून वर्तविला जात आहे.

बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळासाठी रविवारी (ता. 11 ऑक्टोबर) चुरशीने 75 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले होते. त्याची मतमोजणी सध्या सुरू आहे. त्यात पहिलाच निकाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाजूने लागला आहे.

सोमेश्वर साखर कारखान्याच्या २१ संचालकांपैकी तब्बल १५ संचालक सर्वसाधारण गटातून निवडून येतात. कारखान्याच्या कार्यक्षेत्रात सर्वसाधारणाचे ५ गट असून एका गटातून प्रत्येकी ३ संचालक निवडून येतात. त्यानुसार सध्या निंबूत-खंडाळा गटाची मतमोजणी सुरू आहे.

निंबूत-खंडाळा गटातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या विकासपुरुष अजितदादा पवार पॅनेलचे तीनही उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. त्यात अभिजीत काकडे, प्रमोद काकडे आणि डॉ. वसंत दगडे यांनी सुमारे ४००० ते ४५०० मतांनी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या स्थानावर कारखान्याचे माजी अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांचा लोकनेते अजितदादा पवार पॅनेलचे उमेदवार आहेत.

Someshwar Sugar Factory Election Result
Someshwar Sugar Factory Result : ‘सोमेश्वर’चा पहिलाच निकाल सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीच्या बाजूने; संग्राम सोरटे दणदणीत मतांनी विजयी

निंबूत-खंडाळा गटात राष्ट्रवादीला मिळालेल्या आघाडीवरून सर्वसाधारण गटातील १५ जागांचा निकाल काय येणार, याची चुणूक दिसून आली आहे. कारण क्रॉस व्होटिंग होण्याची शक्यता दिसून आलेली नाही, त्यामुळे पॅनेल टू पॅनेल मतदान झाल्याचे सांगण्यात येत आहे, त्यामुळे या १५ जागांवर राष्ट्रवादीचे सर्वच सर्व उमेदवार विजयी होण्याची अंदाज राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.

Someshwar Sugar Factory Election Result
Satara DCC Bank : दोन जीवलग मित्रांनी प्रथमच एकमेकांविरोधात शड्डू ठोकला; सुनील खत्री मदतीची परतफेड करणार की चॅलेंज देणार?

संग्राम सोरटेंनी ब वर्ग गटातून खातं उघडलं...

दरम्यान, ब वर्ग प्रतिनिधी गटामधून राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम सोरटे हे विजयी झालेले आहेत. संग्राम सोरटे यांना निवडणुकीत 131 मतांपैकी तब्बल 92 मते मिळालेले आहेत, त्यामुळे त्यांनी दणदणीत विजय मिळविला आहे. त्यांच्या विजयाची केवळ अधिकृत घोषणा होणे बाकी आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com