Dilip Walse Patil Sarkarnama
पुणे

Dilip Walse Patil: वळसे पाटलांना मराठा आंदोलकांचा धसका; पत्र प्रसिद्ध करीत कार्यक्रम केला रद्द

Maratha Reservation : "पहिलं आरक्षण मगच उद्घाटन" अशी थेट भूमिका आंदोलकांनी घेतली होती

Mangesh Mahale

Manchar : मराठा समाजाच्या विरोधानंतर अखेर मंचर बस स्थानकाच्या कामाचा उद्घाटन सोहळा रद्द करण्यात आला. कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा मराठा समाजाने दिला होता. त्यानंतर हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. येत्या ११ तारखेला हा कार्यक्रम होणार होता. बस स्थानकाची इमारत सात वर्षांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे.

उद्घाटन न करताच जनसेवेसाठी ही इमारत उपलब्ध करून देण्याच्या सूचना सहकारमंत्री दिलीप वळसे पाटलांनी दिल्या आहेत. त्यामुळे उद्घाटनाशिवाय येथील कामकाज सुरू होणार आहे. याबाबतचे पत्र वळसे पाटलांकडून समाजमाध्यमांवर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजित पवार, दिलीप वळसे पाटील, भाजपचे नेते चंद्रकांत पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे, नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत या बस स्थानकाचे उद्घाटन होणार आहे; पण सकल मराठा समाजाने या कार्यक्रमास तीव्र विरोध केला होता. "पहिलं आरक्षण मगच उद्घाटन" अशी थेट भtमिका घेत राज्याच्या प्रमुख नेत्यांना कार्यक्रमस्थळी काळे झेंडे दाखवून अपमान करण्याचा इशारा मंचरचे माजी सरपंच दत्ता गांजळे यांनी दिला होता.

मराठा आरक्षणाबाबत चर्चा करण्यासाठी सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे यांची भेट घेणार आहे. आतापर्यंत तीनदा मुहूर्त हुकल्यावर हे शिष्टमंडळ आज छत्रपती संभाजीनगर शहरात येणार आहेत. या भेटीत शिष्टमंडळाकडून जरांगे यांना टाइम बॉन्ड दिलं जाण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT