Maratha Reservation : मराठा म्हणून जन्मलो हा गुन्हा आहे का? आणखी एक मराठा युवकाची आत्महत्या

Manoj Jarange News : घरातील विजेच्या तारांना पकडून युवकाने आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.
Maratha Reservation  news
Maratha Reservation news Sarkarnama
Published on
Updated on

Hingoli : मनोज जरांगे-पाटील यांनी 'मराठा आरक्षणासाठी टोकाचं पाऊल उचलू नका,' असे आवाहन केल्यानंतरही मराठा युवकांच्या आत्महत्या सुरूच आहेत. आता हिंगोलीत एका मराठा युवकाने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

मराठा समाजात जन्माला आलोय हा माझा गुन्हा आहे का? असा प्रश्न करत उच्च शिक्षण घेऊनदेखील नोकरी मिळत नसल्याने या युवकाने आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. आदिनाथ राखुंडे (वय 27) असे युवकाचे नाव असून त्याने चिठ्ठी लिहून आत्महत्येचे कारण लिहिले आहे. हिंगोलीच्या औंढा तालुक्यातील आजरसोंडा गावातील ही घटना आहे. आत्महत्येसाठी त्याने घरातील विजेच्या तारांना पकडण्याचे भयानक धाडस केल्याचे पोलिसांनी सांगितले.

आरक्षणासाठी तरुणांनी टोकाचे पाऊल उचलू नये, जीवन यात्रा संपवू नये, असे आवाहन मनोज जरांगे-पाटील यांच्यासह विविध नेत्यांनी केले आहे. पण आंदोलन, संघर्ष सुरू असूनही मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने त्यांच्या भावना तीव्र होत चालल्याचे या घटनेवरून दिसून येते.

Maratha Reservation  news
Nashik News: बापरे! जिवंत महिलेस केलं मृत घोषित; बेवारस महिलेला काही तास मिळाली ओळख...

जरांगे पाटील महाराष्ट्र दौरा करणार आहेत. येत्या 15 नोव्हेंबरपासून या दौऱ्याची सुरुवात होणार आहे. 23 नोव्हेंबरला हा दौरा संपणार आहे, अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. 'मराठा समाजाशी पुन्हा एकदा संवाद साधण्याची गरज आहे. त्यामुळे हा महाराष्ट्र दौरा करत आहे,' असे जरांगे-पाटील यांनी म्हटले आहे.

दौऱ्याच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात देशाला आरक्षण देणाऱ्या शाहू महाराजांच्या स्मारकापासून सुरुवात होणार आहे, तर शेवट शेवगावमध्ये होणार आहे, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. एक डिसेंबर समाजाचे महाराष्ट्रातील प्रत्येक गावात साखळी उपोषण सुरू राहील.

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कुणबी नोंद शोधण्याचे काम राज्य सरकारने हाती घेतलेले आहे. त्याचे काम जिल्हापातळीवर सुरू झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात तालुका स्तरावर नेमण्यात आलेल्या समितीकडून कुणबीची नोंद घेण्यास सुरुवात झाल्यानंतर जिल्ह्यात 5 हजार 566 नोंदी सापडल्याची नोंद आहे. यातील सर्वाधिक नोंदी या कागल व करवीर तालुक्यातील आहेत. मराठवाङ्यापेक्षा जास्त कोल्हापूर जिल्ह्यात आढळतील, असा अंदाज आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com