Sharad Pawar, Dilip Walse Patil  Sarkarnama
पुणे

Sharad Pawar News : पवार-वळसे पाटील यांच्या भेटीने भुवया उंचावल्या; काही महत्त्वाचे निर्णय घातले कानावर!

Sharad Pawar Dilip Walse Patil Meeting In Pune : राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे...

Sachin Waghmare

NCP News : आगामी निवडणुकांची तयारी सर्वच राजकीय पक्षांकडून सुरू आहे. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर आमदार अपात्रता संदर्भात विधिमंडळात सुनावणी सुरू आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचा वाद निवडणूक आयोगात पोहोचला आहे, तर सुप्रीम कोर्टातही या वादावर सुनावणी सुरू असतानाच शुक्रवारी पुण्यातील राजकीय घडामोडीने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. मोदी बागेत अजित पवार गटाचे नेते सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. भेटीने संभ्रम निर्माण झाला आहे.

राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शुक्रवारी दुपारी शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून दिलीप वळसे पाटील यांची ओळख आहे. शरद पवारांसोबत चर्चा केल्यानंतर या भेटीबाबत दिलीप वळसे पाटील यांनी प्रसारमाध्यमाशी संवाद साधला. दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी ही भेट घेतली. त्यामुळे या भेटीबाबत कोणताही संभ्रम निर्माण होण्याचे कारण नसल्याचे वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शरद पवारांसोबतची ही भेट पूर्वनियोजित - दिलीप वळसे पाटील

शरद पवारांसोबतची ही भेट पूर्वनियोजित अशी होती. रयत शिक्षण संस्थेच्या कामाच्या निमित्ताने त्यांची भेट घेतली. या वेळी माझ्या समवेत रयत शिक्षण संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. मी अनेक संस्थांमध्ये काम करत आहे. त्या संस्थांच्या कामासाठी शरद पवार यांचे मार्गदर्शन घेत असतो. सहकारी संस्थांचे काही प्रश्न आहेत. ते सोडवण्यासाठी आणि राज्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून काही निर्णय घेण्यात आले आहेत, त्याची माहिती शरद पवार यांना दिली. त्याशिवाय गेल्या काही दिवसांत घेतलेले काही निर्णय त्यांच्या कानावर घातले. इतर काही महत्त्वपूर्ण विषयावर या वेळी चर्चा झाली. मात्र, आमच्यात राजकीय काहीच चर्चा झाली नाही, असेही दिलीप वळसे पाटील यांनी बोलताना स्पष्ट केले.

अशोक पवार हे पुन्हा अजित पवार गटात जाणार का?

मोदी बागेत त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर आमदार अशोक बापू पवार हे दिलीप वळसे पाटलांच्या गाडीत दिसून आले. त्यामुळे अजित पवार गटातून परत आलेले अशोक बापू पवार हे पुन्हा अजित पवार गटात जाणार का ? अशा चर्चादेखील राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT