Kolhapur Politics News : 17 नोव्हेंबर हा कोल्हापूरच्या राजकारणातील महत्त्वाचा दिवस असणार आहे. या दिवशी महाराष्ट्रातील तीन दिग्गज कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. मराठा समाजाच्या आरक्षण लढ्यात केंद्रस्थानी बनलेले मनोज जरांगे पाटील, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकाच दिवशी कोल्हापुरात येत असल्याने त्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.
अखिल महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ यांच्या वतीने जयसिंगपूर येथे 60 वे राज्यस्तरीय शैक्षणिक संमेलन कोल्हापुरात पार पडणार आहे. हातकणंगले तालुक्यातील संजय घोडावत इन्स्टिट्यूट येथे होणार आहे. या संमेलनाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर असणार असल्याची माहिती समोर आली आहे. दोघेही एकाच मंचावर येणार असल्याने त्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दुसरीकडे मराठा समाजाच्या आरक्षण मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. 17 नोव्हेंबरला ते कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधीस्थळी दर्शन घेऊन कोल्हापुरातील सभा पार पाडणार आहेत.
हे तीन दिग्गज एकाच दिवशी कोल्हापूर दौऱ्यावर असल्याने त्याला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. शिवाय त्या दिवशी पोलिसांची ही धावपळ उडणार असल्याचे चित्र आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.