Dilip Walse Patil  Sarkarnama
पुणे

Dilip Walse Patil News : दिलीप वळसे पाटलांनी टायमिंग साधलं; मंत्रि‍पदासाठी पेरणी?, 'त्या' वक्तव्यामुळे वेगळीच चर्चा

Local Body Election NCP BJP : दिलीप वळसे पाटील यांनी जाहीर सभेत आपले काहीसे राजकीय वजन कमी झाल्याची कबुली दिली होती. त्यांच्या या कबुलीमुळे ते पुन्हा मंत्रिपद मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची चर्चा आहे.

Sudesh Mitkar

Pune News : एकीकडे नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच दुसरीकडे महायुतीच्या राज्यातील सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहेत. अशातच माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे त्यांना मंत्रिपदाची आस लागली आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळा सुरू झाली आहे. वळसे पाटलांच्या या वक्तव्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सह भाजप नेते देखील चिंतेत पडले आहेत.

राष्ट्रवादीतील पक्षफुटीनंतर ही मंत्रिपदी वर्णी लागलेल्या दिलीप वळसेंचा 2024च्या विधानसभेत 1500 मतांनी निसटता विजय झाला. त्यामुळे महायुतीच्या सत्तेत त्यांना मंत्रिपदावरुन डावलण्यात आल्याचं बोललं जातं. कमी मतांनी निवडणूक जिंकल्याने अशा परिस्थितीत मी कोणत्या तोंडाने मंत्रिपद मागू, असं निकालानंतर वळसेंनी समर्थकांसमोर जाहीर वक्तव्य केलं होतं.

आता राज्यातील महायुती सरकारची वर्षपूर्ती झाली आहे आणि त्याचवेळी माझं राज्यातील वजन कमी झाल्याची कबुली वळसे पाटलांनी दिली आहे. त्यामुळे वळसेंनी हे टायमिंग साधून मंत्रिपदासाठी पेरणी केली आहे का ? अशी चर्चा सुरू झाली आहे.

वळसे पाटील म्हणाले, या वेळेला काय झालं माझे मलाच कळलं नाही. मग, जास्त नाही पण राज्यात माझं वजन थोडं कमी झालं आहे. तुम्ही मला जसं निवडून दिलं होतं तसं अमोल कोल्हे यांना निवडून दिलं होतं. मात्र त्यांनी एक रुपयाचं काम केलं नाही तरीही गेल्या लोकसभा निवडणुकीत पिंपरी दुमला गावातून माजी खासदार आढळराव पेक्षा कोल्हेंना 251 मते जास्त दिली.

ज्यांनी काम केलं नाही त्याला तुम्ही पाठींबा दिली. आढळराव काम करत होते तुमच्याकडे येत होते बसत होते. मात्र त्यांचा पराभव झाला. मात्र त्यामुळे पार्लमेंट मध्ये दिल्लीच्या स्तरावर, केंद्र सरकार मध्ये जे प्रश्न आपल्याला सोडवायचे होते त्याला आता मर्यादा येत आहे.

मी काही तुमच्यावर नाराज नाही....

दरम्यान माझा हात मोडला, नवीन खुबा बसवावा लागला त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये मला फारसं बाहेर येता आलं नाही. विधानसभा निवडणुकीत सुद्धा लोकांपर्यंत जितकं पोहोचायला हवं होतं तेवढं मी पोहोचू शकलो नाही. आणि याचाच फायदा ज्यांना आम्ही दहा वर्ष कारखान्याचे चेअरमन केलं आठ वर्ष मार्केट कमिटीचा सभापती केले मानसन्मान दिला त्यांनी घेतला, असे ते म्हणाले.

देश स्तरावर आणि राज्यस्तरावर बदललेल्या राजकारणाचा मला फटका बसला आणि पिंपरी दुमला या गावाने मला 42 मताने मागे ठेवले. ठीक आहे मी काही तुमच्यावर नाराज नाही झालो, मी काम करतच राहिलो. असे वळसे पाटील म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT