Congress-BJP News : लातूरमध्ये काँग्रेसला धक्का, माजी महापौराने हाती घड्याळ बांधल्यानंतर आता माजी आमदाराच्या हाती कमळ!

Latur Rural EX MLA Join BJP : रेणा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीत चेअरमन पदाचा शब्द देऊन डावलले गेल्याचे भिसे यांचे समर्थकाकडून जाहीरपणे बोलले जात होते.
Ex. Congress MLA Tambak Bhise Join BJP News
Ex. Congress MLA Tambak Bhise Join BJP NewsSarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. लातूरमध्ये काँग्रेसला आणखी एक धक्का बसला असून माजी महापौरानंतर माजी आमदारही पक्ष सोडण्याची घोषणा.

  2. येत्या काही दिवसांत संबंधित माजी आमदार भाजपमध्ये औपचारिक प्रवेश करणार असल्याची माहिती.

  3. या घडामोडीमुळे लातूरमध्ये काँग्रेसची संघटनात्मक शक्ती कमकुवत, तर भाजप मजबूत होण्याचे संकेत.

सुधाकर दहिफळे

Latur Politics : ऐन नगर परिषद निवडणुकीचा प्रचार जोमात असताना लातूर जिल्ह्यात काँग्रेसला एकापाठोपाठ एक धक्के बसू लागले आहेत. काल काँग्रेसचे माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. तर आता लातूर ग्रामीणचे माजी आमदार त्र्यंबक भिसे हे उद्या (ता.27) रोजी उदगीर येथील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. तत्पुर्वी त्यांनी भाजपाचे आमदार तथा जिल्ह्यातील नेते रमेश कराड यांची भेट घेत पक्षप्रवेशाच्या शुभेच्छा स्वीकारल्या.

लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी आमदार ॲड. त्र्यंबकनाना भिसे हे काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपचे कमळ हाती घेणार आहेत. या प्रवेशामुळे लातूर ग्रामीण मतदारसंघात भाजपची ताकद वाढणार असल्याचे बोलले जाते. ॲड. भिसे हे मुळचे भोकरंबा (ता. रेणापूर ) येथील रहिवाशी असून शेतकरी कुटुंबातून ते येतात. त्यांचे वडील श्रीरंगराव भिसे हे स्वातंत्र्यसैनिक होते. तत्कालीन अंबाजोगाई तालुका असताना श्रीरंगराव भिसे हे अंबाजोगाई पंचायत समितीचे दहा वर्षे उपसभापती होते.

माजी आमदार भिसे यांना राजकीय वारसाही मिळाल्याने विधी शाखेची पदवी घेतल्यानंतर थेट राजकारणात प्रवेश करत 1992 ला पोहरेगाव जिल्हा परिषद गटातून त्यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाली होती. मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत त्यांनी राजकारणाचा श्रीगणेशा केला होता. याच मतदारसंघातून तीन वेळा काँग्रेस पक्षाकडून त्यांनी विजय मिळवला होता. भिसे यांनी लातूर जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती म्हणूनही काम पाहिले.

Ex. Congress MLA Tambak Bhise Join BJP News
Latur News: ऐन निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; 11 उमेदवारांनी घेतला मोठा निर्णय

माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख व माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचे ते कट्टर समर्थक म्हणून ओळखले जायचे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून त्यांना काँग्रेसने उमेदवारी दिली व ते मताधिक्याने विजयी झाले. राज्यात नावलौकिक असलेल्या निवाडा (ता. रेणापूर ) येथील रेणा सहकारी साखर कारखान्याचे स्थापनेपासून ते संचालक आहेत. मतदारसंघातील ग्रामीण भागात नाना या नावानेच त्याना लोक ओळखतात.

Ex. Congress MLA Tambak Bhise Join BJP News
Congress Politics : 'ज्याने पाच नगरसेवक घेऊन शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला त्यालाच काँग्रेसने फोडले

2019 च्या विधानसभा निवडणूकीत धीरज देशमुख यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली आणि ॲड. भिसे यांना डावलण्यात आले. तरीही भिसे यांनी धिरज देशमुख यांचेच काम केले. 2024 च्या विधानसभा निवडणूकीतही त्यानी धिरज देशमुख यांचेच काम केले. परंतु आमदार रमेश कराड यांनी धिरज देशमुख यांचा पराभव केला. तरीही भिसे यानी काँग्रेसची साथ सोडली नाही. यानंतर झालेल्या रेणा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीत चेअरमन पदाचा शब्द देऊन डावलले गेल्याचे भिसे यांचे समर्थकाकडून जाहीरपणे बोलले जात होते.

भिसे यांच्या नाराजीचे मुळ कारणही हेच असल्याची चर्चा आहे. कार्यक्षमता असताना वारंवार डावलले जात असल्यामुळे भिसे समर्थकांकडून निर्णय घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव वाढत होता. यामुळे भिसे यांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या भाजपतील प्रवेशामुळे आगामी नगरपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कराड-भिसे यांची भेट

लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार रमेशआप्पा कराड यांनी मंगळवारी ता. (25 ) माजी आमदार त्रिंबकनाना भिसे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली व सत्कार केला. याचे फोटो समाज माध्यमावर व्हायरल झाल्यानंतर मतदारसंघात याची जोरदार चर्चा सुरु आहे. याबाबत भिसे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपामध्ये उदगीर येथील सभेत प्रवेश करणार असल्याचे सांगीतले.

5 FAQs (Marathi)

1. लातूरमध्ये कोणत्या नेत्यांनी काँग्रेस सोडली?
माजी महापौर आणि आता माजी आमदार पक्ष सोडत असल्याचे समोर आले.

2. ते कोणत्या पक्षात प्रवेश करणार आहेत?
एकाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये तर एक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

3. यामागील मुख्य कारण काय सांगितले जात आहे?
स्थानिक पातळीवरील मतभेद, पक्षात योग्य स्थान न मिळणे आणि विकासाच्या राजकारणाचे कारण पुढे केले जात आहे.

4. काँग्रेसवर याचा काय परिणाम होऊ शकतो?
लातूरमध्ये काँग्रेसचे राजकीय बळ कमी होण्याची शक्यता वाढली आहे.

5. कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया काय आहे?
काँग्रेसमध्ये नाराजी, तर भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com