Cantonment Board, Pune News : खडकी व पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड महापालिकेमध्ये समाविष्ट करण्याची चर्चा अनेक दिवसांपासून रंगत आहे. त्या संबंधित बोर्डासंबंधीची अद्ययावत माहितीचा अहवाल राज्य सरकारने (State Government) महापालिकेकडे मागविला होता. मात्र, आत्तापर्यंत तरी कॅन्टोन्मेंट बोर्ड संबंधिचा अहवाल राज्य सरकारला पाठविण्यात आलेला नाही.
राज्यातील सात कॅन्टोन्मेंट बोर्ड त्यांच्या जवळील महापालिका क्षेत्रात समाविष्ट करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. त्याबाबत अन्य महापालिकांसमवेतच पुणे महापालिकेलाही राज्य सरकारने बोर्डाबाबतची अद्ययावत माहितीचा अहवाल मागविला होता. पुण्यात खडकी व पुणे (Pune) कॅन्टोन्मेंट बोर्ड आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाचा कारभार लष्कराच्या देखरेखीखाली सुरु आहे.
मागील काही वर्षांपासून कॅन्टोन्मेंट बोर्डाची निवडणुक झाले नाही. नागरी भागातील एक प्रतिनिधी कॅन्टोन्मेंट बोर्डामध्ये नागरीकांचे प्रतिनिधीत्व करत असतो. त्यामुळे कॅन्टोन्मेंट बोर्डांची निवडणुक घ्यावी, असा आग्रह स्थानिक नागरीकांकडून केला जात आहे. दरम्यान, काही महिन्यांपुर्वी निवडणुका देखील जाहीर झाल्या होत्या. मात्र, या निवडणुका तत्काळ रद्द करण्यात आल्या होत्या.
संरक्षण विभागाने कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मुख्य अधिकाऱ्यांना संबंधित बोर्ड स्थानिक महापालिकेत समाविष्ट करण्याबाबतची माहिती मागविली होती. त्याच पद्धतीने राज्य सरकारने देखील महापालिकांकडे माहिती मागविली होती. राज्य सरकारने पुणे महापालिकेकडे पुणे व खडकी कॅन्टोन्मेंटबाबतची माहिती मागविली होती. मात्र, अद्याप त्यासंबंधीची माहिती राज्य सरकारकडे पाठविण्यात आली नसल्याचे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.