पिंपरी : राज्य पोलिस दलातील महाराष्ट्र पोलिस सेवा (मपोसे) आणि भारतीय पोलिस सेवेतील (भापोसे म्हणजे आयपीएस) ११९ अधिकाऱ्यांच्या राज्य सरकारने काल (ता.७ नोव्हेंबर) बदल्या केल्या.
त्यातील नऊ डीसीपी तथा एसपींच्या बदल्यांना २४ तासांच्या आत (ता.८ नोव्हेंबर) आज स्थगिती देण्यात आली. त्यातून या बदल्यांतील घोळ पुन्हा समोर आला आहे. तसेच स्थगिती व अनेकांना नियुक्तीही न दिल्यामुळे वेगळीच चर्चा पोलिस खात्यात रंगली आहे.
काल बदल्या करण्यात आलेले नऊ वरिष्ठ पोलिस अधिकारी वगळता इतरांनी तत्काळ बदलीच्या ठिकाणी रुजू व्हावे, असा सुधारित बदली आदेश राज्याचे अप्पर पोलिस महासंचालक (आस्थापना)संजीवकुमार सिंघल यांनी आज काढला. दरम्यान, कालच्या बदलीतील दहाजणांना बदलीचे ठिकाणच (नवी पोस्टिंग) देण्यात आलेले नाही. (DCP Transfer Latest News Latest News)
राज्यात नवीन सरकार आल्यानंतर गेल्या महिन्यात २० तारखेला प्रथमच ४३ एसपी (डीसीपी) लेवलच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. मात्र, त्यात सुद्धा घोळ घालण्यात आल्याचे नंतर दिसून आले. कारण त्यातील तीन बदल्यांना २४ तासांतच स्थगिती देण्यात आली. तर, १९ जणांना नियुक्तीचे ठिकाणच देण्यात आले नव्हते. ते १८ दिवसांनी काल देण्यात आले. मात्र, काल केलेल्या बदल्यांत पुन्हा दहाजणांना वेटिंगवर ठेवण्यात आले आहे. यातून अर्थपूर्ण व्यवहासाठी, तर या काही नियुक्त्या रोखण्यात आल्या नाहीत ना, अशी चर्चा पोलीस वर्तुळात सुरु झाली आहे.
पोलिस उपायुक्त (डीसीपी) परिमंडळ (झोन) चार ठाणे प्रशांत मोहिते, डीसीपी पुणे नम्रता पाटील, एसपी, फोर्स वन संदीप डोईफोडे, एसपी राज्य सुरक्षा महामंडळ दीपक देवराज, डीसीपी आर्थिक गुन्हे शाखा ठाणे सुनील लोखंडे, अप्पर एसपी पालघर प्रकाश गायकवाड, अप्पर एसपी कोल्हापूर तिरुपती काकडे, डीसीपी झोन २ ठाणे योगेश चव्हाण, डीसीपी, राज्य गुप्तवार्ता विभाग (एसआयडी) शर्मिला घार्गे (शर्मिष्ठा वालावलकर) यांच्या काल झालेल्या बदल्यांना आज स्थगिती देण्यात आली आहे.
मोहिते यांची एसपी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी),पाटील यांची राज्याची आर्थिक गुन्हे शाखा, मुंबई, देवराज यांची एसआरपी पुणे, लोखंडेची डीसीपी नागपूर, गायकवाडांची डीसीपी सोलापूर, काकडेंना एसपी, फोर्स वन मुंबई, चव्हाणांची डीसीपी नवी मुंबई,तर घार्गे-वालावलकर यांची एसीबी नाशिक विभागात बदली करण्यात आली होती.
तर, प्रसाद अक्कानुरु, श्वेता खेडकर, विजयकांत सागर, प्रशांत वाघुंडे, विशाल गायकवाड, अजित बोराडे, दत्ता नलावडे, दत्तात्रेय कांबळे, ज्योती क्षीरसागर आणि नांदेडचे अप्पर पोलिस अधीक्षक निलेश मोरे यांची काल बदली करूनही त्यांना नवी नियुक्ती देण्यात आलेली नाही. ती नंतर देण्यात येईल, असे राज्याच्या गृह विभागाचे सहसचिव व्यंकटेश भट यांनी कालच्या आदेशात नमूद केलेले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.