पुणे : शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी साम वृ्त्तवाहिनीच्या प्रतिनिधीला "आधी कुंकू लाव, मग तुझ्याशी बोलेन", या केलेल्या वक्तव्यामुळे ते अडचणीत आले आहेत. यावरून त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती.
दरम्यान, या प्रकरणाची दखल राज्य महिला आयोगाने घेतली असून भिडेंना याबाबत आपली भुमिका मांडण्यासाठी दोन नोटीशी बजावल्या आहेत. मात्र, अद्यापही या नोटीशींना उत्तर न आल्याने महिला आयोगाकडून पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे संकेत महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना ट्विटरच्या माध्यमातून दिले आहेत. (Sambhaji Bhide, Rupali Chakankar Latest News)
भिडे यांनी केलेल्या वक्तव्यावर आपली बाजू स्पष्ट करावी, असे आदेश महिला आयोगाने २ नोव्हेंबरला दिले होते. त्यावर त्यांनी काहीही स्पष्टीकरणं दिलं नसल्याने त्यांना पुन्हा काल (ता.७ नोव्हेंबर) पुन्हा नोटीस बजावण्यात आली आहे.
आता या नोटीसला भिडे यांनी उत्तर न दिल्यास त्यांचे काही म्हणणे नाही,असे गृहीत धरुन पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे,असे चाकणकर यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी मंत्रालयात मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतल्यानंतर साम वृ्त्तवाहिनीच्या एक महिला पत्रकार त्यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी त्यांच्याकडे गेल्या असता त्यांनी महिला पत्रकाराला "आधी कुंकू लाव, मग तुझ्याशी बोलेन. आमची अशी भावना आहे की प्रत्येक स्त्री ही भारतमाता आहे. भारतमाता विधवा नाहीये. कुंकू लावून या मग तुमच्याशी बोलेन.", असे वक्तव्य केलं होतं.
यावरून भिंडेंवर अनेक संघटनांकडून टीका करण्यात आली होती. यानंतर महिला आयोगानेही याची दखल घेतली असून त्यांना या वक्तव्याबाबत खुलासा मागितला होता. मात्र यावर त्यांनी कुठलेही उत्तर दिले नाही. यामुळे पुन्हा त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
चाकणकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, "महिला पत्रकाराचा टिकली लावली नाही म्हणून अवमान करणाऱ्या संभाजी भिडेंनी आपल्या वक्तव्याचा तातडीने खुलासा करावा अशी नोटीस आयोगाकडून दि. ०२/११/२०२२ रोजी बजावण्यात आली होती. यावर अद्याप त्यांच्याकडून खुलासा न आल्याने त्यांना आज पुन्हा नोटीस बजावण्यात आली आहे." असे चाकणकर यांनी म्हटले आहे. आता भिडे यांनी या देखील नोटीशीला उत्तर दिले नाही तर त्यांच्यावर आयोगाकडून काय कारवाई होणार हे बघावं लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.