Devendra Fadnavis On Division Of Pune District
Devendra Fadnavis On Division Of Pune District Sarkarnama
पुणे

Division Of Pune District: पुणे जिल्ह्याचं विभाजन करणार का? ; देवेंद्र फडणवीस म्हणाले...

Chetan Zadpe

Pune District News: चिंचवड शहर आणि लगतच्या भागाचं शिवनेरी जिल्हा म्हणून नवीन जिल्ह्याची निर्मिती करावी, अशी मागणी भाजप आमदार महेश लांडगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यामुळे पुणे जिल्ह्याचं विभाजन होणार का? याबाबत चर्चा सुरू झाली होती. दरम्यान याबाबत आता खुद्द फडणवीसांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

"जिल्हा विभाजनाच्या अनेक मागण्या आमच्याकडे आहेत. त्यामुळे एखाद्या जिल्ह्याचा विचार याठिकाणी करता येणार नाही. सर्वांचा विचार एकत्रितपणे करावा लागेल. एखादी मागणी करणे, त्यांचा अधिकार आहे. नगर जिल्ह्याचा तीन वेगवेगळ्या मागण्या आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या काही मागण्या आहेत. अशा अनेक जिल्ह्यांच्या विभाजनाच्या मागण्या आहेत, मात्र आता त्यावर बोलता येणार नाही," असे फडणवीस म्हणाले.

महापालिका निवडणुका :

मागील अनेक काळापासून महानगर पालिकेच्या निवडणुका रखडलेल्या आहेत. आता या निवडणुकांबाबत देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकांसंदर्भात त्यांनी आता शक्यता वर्तवली आहे. महानगरपालिकेच्या निवडणुका या ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये होऊ शकतात, असं मोठं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

उद्धव ठाकरेंवर टीका :

"जनतेच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात पुन्हाआपलं सरकार आलं. खरं म्हणजे 2019 ला जनतेने आम्हाला निवडून दिलं होतं. त्यावेळी आपण युतीमध्ये लढलो. जनतेने युतीला 170 जागा दिल्या. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने खुर्चीसाठी विचार सोडला. त्यांना खुर्चीचा एवढा मोह झाला होता की, विचार सोडून ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर जाऊन मुख्यमंत्रीपदाच्या लालसेपोटी जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे महाराष्ट्रात अभद्र असं महावसूली सरकार आलं ", अशी टीकाही देवेंद्र फडणवीसांनी केली केलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT