Uddhav Thackeray, Nana Patole, Sharad Pawar Sarkarnama
पुणे

Maharashtra Politics : भाजपमधील आयारामांना उमेदवारी देऊ नका; 'मविआ'तील नेत्यांना पत्राद्वारे इशारा

सरकारनामा ब्युरो

Pune News, 05 Oct : 'बदलते जनमत पाहून इंडिया आघाडीतील पक्षांमध्ये येणाऱ्या आयाराम, गयाराम प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी देऊ नये,' अशा शब्दात सामाजिक चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) प्रमुख नेत्यांना पत्राद्वारे इशारा केली आहे.

इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीने लोकसभेला चांगली कामगिरी केली आहे. शिवाय राज्यातील राजकीय वातावरण बदलल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजपसह महायुतीतील नेते महाविकास महाविकास आघाडीतील घटक पक्षात प्रवेश करत आहेत.

मात्र, अडचणीच्या काळात पक्ष सोडून भाजपमध्ये (BJP) गेलेल्या कार्यकर्त्यांना इंडिया आघाडीने पुन्हा पक्षात घेऊन त्यांना विधानसभेची उमेदवारी दिल्यास आम्ही त्या उमेदवारांचे काम करणार नाही, असा इशारा सामाजिक चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांना दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार वर्षा गायकवाड, खासदार संजय राऊत या प्रमुख नेत्यांना हे पत्र पाठवण्यात आलं आहे.

या पत्रावर ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ. जी. जी. पारिख, ज्येष्ठ गांधीवादी नेते तुषार गांधी, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष अविनाश पाटील, राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन वैद्य, विद्रोही चळवळीचे नेते धनाजी गुरव, ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते सुभाष वारे, साहित्यिक अर्जुन डांगळे, लोकशाहीर संभाजी भगत आदींसह साठ पेक्षा जास्त प्रमुख कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी, अविनाश पाटील, फिरोज मिठीबोरवाला, गुड्डी, शरद कदम, विशाल विमल यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.

त्यांनी या पत्रात लिहिलं की, बदलते जनमत पाहून इंडिया आघाडीतील पक्षांमध्ये येऊ इच्छित आहेत. त्यांना पक्षात प्रवेश द्यायचा की नाही, हा पूर्णपणे इंडिया आघाडीतील पक्षांचा अधिकार आहे. परंतु अशा आयाराम, गयाराम प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी देऊ नये, अशी भूमिका या पत्राद्वारे सामाजिक कार्यकर्त्यांनी घेतली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT