Nitin Deshmukh : 'दिल्लीवरून फोन होता, जीवे मारण्याचा डाव होता'; आमदार देशमुखांचं दानवेंसमोर खळबळजनक विधान

Akola MLA Nitin Deshmukh has made serious allegations against the Shiv Sena Eknath Shinde group : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार नितीन देशमुख यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
Nitin Deshmukh
Nitin Deshmukh Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अकोला इथले आमदार नितीन देशमुख यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय. हे करताना त्यांनी भाजपच्या आमदाराचा हवाला दिला आहे.

"आपण ज्यावेळी सुरत गेला होता, त्यावेळी दिल्लीवरून एक फोन आला होता. कोणत्याही परिस्थिती नितीन देशमुख परत जाता कामा नये, मारून टाकायचे काम पडले, तर गेम करून टाका", असा गौप्यस्फोट आमदार नितीन देशमुख यांनी केला आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) पक्षाचे नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासमोर आमदार नितीन देशमुख यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. 'सुरतच्या मार्गावरून मागे फिरत असेल, आणि ऐकत नसेल, तर मारून टाका. त्यावेळी माझ्याविषयी वृत्तवाहिन्यांवर हृदयविकाराच्या झटका आला म्हणून बातम्या देखील फिरवल्या होत्या', असेही आमदार नितीन देशमुख यांनी म्हंटलं.

Nitin Deshmukh
Maharashtra Assembly Election 2024 : है तयार हम; भाजप 'इलेक्शन' मोडवर

नितीन देशमुख म्हणाले, "सत्तेत असलेल्या शिवेसना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाने माझी चौकशी लावली आहे. मुल शिकत असलेल्या वर्गातून आर्थिक उत्पन्न, त्यांच्या शालेय शुल्काची माहिती घेतली जात आहे. यात मी डगमगलो नाही. आपण सुरतला गेलो होतो, तेव्हा माझ्यासोबत घात करण्याचा डावा होता. इंजेक्शन दिले गेले. त्यावेळी आमदार देशमुख यांना हृदयविकार झटका आला, असे वृत्त पसरविण्यात आले". आता मला पराभूत करण्यासाठी कटकारस्थानं रचली जात आहे, असे देखील नितीन देशमुख यांनी म्हटले.

Nitin Deshmukh
Sharad Pawar : मनोज जरागेंचा प्रभाव असलेल्या मराठवाड्यात शरद पवारांची खास रणनीती

'गद्दारांबरोबर गेलो नाही. त्यामुळे चौकशीचा ससेमिरा माझ्याभोवती लावली गेली. वेगवेगळ्या चौकशी सुरू आहेत. या चौकशीत मी सर्व माहिती दिली आहे. सातत्याने माझ्या मालमत्तांची चौकशी होत आहे. 2019 च्या निवडणुकीत दाखल केलेल्या अर्जात संपत्तीचे विवरण दिलेले आहे. आता ज्यांनी तक्रार केली आहे, त्यांनी बेहिशोबी मालमत्ता कुठे आहे, याची माहिती दिली असेल. दोन वर्षानंतर एसीबीच्या लोकांना जाग येत असेल, तर यावर मी काय बोलावं, अशा अधिकाऱ्यांचा सत्कार केला पाहिजे. माझी बेहिशोबी मालमत्ता कुठे आहे, ती ताब्यात घ्यावी आणि माझ्यावर कारवाई करावी', असे आव्हान आमदार नितीन देशमुख यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com