Ajit Pawar Sarkarnama
पुणे

‘त्यांच्या’ निर्णयाची पावती आमच्या नावावर फाडू नका; असं का म्हणाले अजितदादा !

पुणे महापालिकेतवर सध्या प्रशासक आहे.राज्य सरकार म्हणून आम्ही आमचे काम करत आहोत.

सरकारनामा ब्यूरो

पुणे : पुण्यात मेट्रो स्टेशनसाठी (Pune Metro) बालगंधर्व रंगमंदीराच्या जागेवर नवी इमारत बांधण्याचा निर्णय पुणे महापालिकेत भाजपाची सत्ता असताना झाला आहे. त्यामुळे त्यांच्या काळात झालेल्या निर्णयाची पावती आमच्या नावावर फाडू नका, असे सल्ला उमपुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज दिला.

पुणे महापालिकेतवर सध्या प्रशासक आहे.राज्य सरकार म्हणून आम्ही आमचे काम करत आहोत. जेव्हा निवडणूक लागेल तेव्हा या संदर्भात जे आवाहन करायचं ते मी करीत, असेही पवार यांनी स्पष्ट केले. बालगंधर्वच्या जागेवर बांधकामाचा नवा नेमका काय प्लॅन आहे याची मला नेमकी माहिती नाही. मात्र, रंगमंदीर पाडण्याबाबत दोन मतप्रवाह आहेत.जेव्हा असे काही निर्णय घेतले जातात तेव्हा अशाप्रकारे दोन मतप्रवाह असतातच. बालगंधर्व रंगमंदीराशी कलाकारांचे वेगळे नाते आहे. त्यामुळे त्यांची काही भूमिका असे स्वभाविक आहे, असे मत पालकमंत्री पवार यांनी मांडले.

सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी पुण्यात भिडे वाड्यात सुरू केलेल्या मुलींच्या पहिल्या शाळेच्या जागेवर स्मारकाचा विषय अनेक वर्षांपासून सुरू आहे. यासाठी लागणारा निधी कमी पडूदेणार नाही. महापालिकेच्या अंदाजपत्रातही यासाठी तरतूद करण्यात आली आहे, असे पवार यांनी स्पष्ट केले.एसटी कामगारांचे नेते गुणरत्न सदावर्ते यांनी काढलेल्या एसटी कामगारांच्या नव्या संघटनेबाबत विचारले असता पवार म्हणाले, ‘‘ लोकशाहीत संघटना स्थापन करण्याचा, निवडणुका लढविण्याचा, लोकांसाठी काम करण्याचा आधिकार सर्वांना आहे.’’

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या संदर्भाने विचारलेल्या प्रश्‍नावर बोलताना पवार म्हणाले, ‘‘ न्याय व्यवस्थेवर बोलणं आमच्या सारख्याचा अधिकार नाही. प्रत्येकाचे मत असते. काहींना फडणवीस यांचे तर काहींना उद्धव ठाकरे यांचे सरकार योग्य वाटत असेल. मला त्यावर काही बोलायचं नाही.’’ माझा पुतण्या, माझा मोठा भाऊ आयोध्येला जाऊन आले. कुठल्याही धार्मिक स्थळाला जायचे असेल ‘डंके की चोट पे’ अशी मोठी चर्चा घडवून आणून जायची गरज नाही.आपलं आपण जावं दर्शन घ्यावे आणि यावे. त्याचा ‘प्रपोगण्डा’ करण्याची गरज नाही, असे पवार यांनी सांगितले.

Edited By : Umesh Ghongade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT