राजकारण तापलं! सासूबाईंशी न पटल्यानं जावयानं थेट पक्षालाच केला रामराम

पक्षाचा सरचिटणीस असलेल्या जावयानेच दिला तडकाफडकी राजीनामा
Pakaj Patel, Jotiraditya Scindia, Rahul Gandhi, Priyanka Gandhi and Krishna Patel (File Photo)
Pakaj Patel, Jotiraditya Scindia, Rahul Gandhi, Priyanka Gandhi and Krishna Patel (File Photo) Sarkarnama
Published on
Updated on

लखनौ : उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा राजकारण तापलं आहे. याला अपना दल कमेरावादी पक्षातील अंतर्गत मतभेद कारणीभूत आहेत. पक्षाच्या अध्यक्षा कृष्णा पटेल यांच्याशी पटत नसल्याने त्यांचे जावई व पक्षाचे सरचिटणीस पंकज पटेल यांनी पक्षाला तडकाफडकी रामराम केला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे पंकज यांच्या पत्नी पल्लवी पटेल याही पक्षाची धुरा सांभाळत आहेत.

विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य (Keshav Prasad Maurya) यांना पल्लवी पटेल (Pallavi Patel) यांनी धूळ चारली होती. यामुळे भाजपची अवस्था गड आला पण सिंह गेला, अशी झाली होती. त्यावेळी पल्लवी या जायंट किलर ठरल्या होत्या. त्यांच्या विजयात त्यांचे पती पंकज पटेल यांचा मोठा वाटा होता. आता पक्षाचे सरचिटणीस असलेले पंकज हेच पक्ष सोडून गेल्याने त्यांना मोठा धक्का बसला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा पटेल आणि पंकज पटेल यांच्यात काही दिवसांपासून वाद सुरू होते. यातूनच त्यांनी सरचिटणीसपदाचा राजीनामा देत पक्षालाही रामराम केला आहे.

Pakaj Patel, Jotiraditya Scindia, Rahul Gandhi, Priyanka Gandhi and Krishna Patel (File Photo)
उपमुख्यमंत्र्यांना हरवणाऱ्या पल्लवी पटेल यांच्या नवऱ्यानेच आता सोडला पक्ष

उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) पल्लवी यादव यांच्या अपना दल कमेरावादी पक्षाने समाजवादी पक्षासोबत आघाडी केली होती. त्यांनी विधानसभा निवडणुकीत केलेल्या कामगिरीमागे त्यांचे पती पंकज पटेल यांची ताकद होती. आता पंकज पटेल यांनी थेट पक्षाचा राजीनामा दिल्याने वाद चव्हाट्यावर आला आहे. पंकज हे आधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ प्रचारक होते. नंतर पल्लवी यांच्यासोबत विवाह झाल्यानंतर ते अपना दलात सक्रिय झाले होते.

Pakaj Patel, Jotiraditya Scindia, Rahul Gandhi, Priyanka Gandhi and Krishna Patel (File Photo)
केंद्रीय मंत्र्यासह उपमुख्यमंत्री अडचणीत! उच्च न्यायालयानं ओढले ताशेरे

अपना दल कमेरावादी पक्षाच्या प्रमुख कृष्णा पटेल आहेत. त्यांच्यासोबत कन्या पल्लवी या पक्षाची धुरा सांभाळत आहेत. पल्लवी यांचे पिता सोनेलाल पटेल यांच्या निधनानंतर अपना दल पक्षात फूट पडली होती. सोनेलाल यांच्यानंतर त्यांच्या पत्नी कृष्णा या पक्षाच्या अध्यक्षा बनल्या होत्या. त्यावेळी पल्लवी यांच्या भगिनी अनुप्रिया पटेल यांनी पक्षातून बाहेर पडून अपना दल (सोनेलाल) या पक्षाची स्थापन केली होती. अनुप्रिया पटेल या सध्या पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com