Ajit Pawar_Murlidhar Mohol  Sarkarnama
पुणे

Murlidhar Mohol: अजित पवारांचा मोदी, फडणवीसांच्या नेतृत्वावर विश्‍वास नाही का? मोहोळांचा सवाल; पुणे मेट्रोवरुन श्रेयवादाची लढाई सुरु

Murlidhar Mohol: पुण्यात २००१ ते २०१४ या कालावधीत मेट्रो आणण्याची केवळ चर्चा करण्यात आली, त्यावेळी मनमोहन सिंग पंतप्रधान तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री होते.

सरकारनामा ब्युरो

Murlidhar Mohol: पुण्यात २००१ ते २०१४ या कालावधीत मेट्रो आणण्याची केवळ चर्चा करण्यात आली, त्यावेळी मनमोहन सिंग पंतप्रधान तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री होते. यांच्या काळात मेट्रोचे एक इंचही काम पुण्यात झाले नाही, भाजपच्या काळात मेट्रोचे काम सुरु झाले आणि मेट्रो धावली देखील, अशा शब्दांत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी अजित पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे.

नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर त्यांना विश्‍वास नाही का? असा सवालही त्यांनी केला. पुण्यातील मेट्रो मनमोहन सिंग यांच्या काळातील आहे, बाकिच्यांनी केवळ उद्‍घाटन केलीत अशी टीका अजित पवार यांनी भाजपवर केली होती.

मेट्रोमॅन श्रीधरन यांनी २००९ मध्ये पुणे मेट्रोचा अहवाल सादर केला. २०१० मध्ये महापालिकेने वनाज ते रामवाडी एका मार्गाला मान्यता दिली. पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वात महापालिकेत सत्ता होती. पण या महापालिकेने खर्चाचा मुद्दा उपस्थित करत मेट्रोला निधी देण्यास नकार दिला. त्यामुळे एकाच मार्गाचा प्रस्ताव दिल्लीला पाठविण्यात आला होता.

पण दोन्ही मार्गांचा प्रस्ताव पाठवा असे आदेश दिल्लीतून देण्यात आले. यामुळे वेळ वाया गेल्याने मेट्रोचा खर्च ८ हजार कोटीवरून १० हजार कोटींवर पोचला. अजित पवार यांच्याच पक्षामुळे पुण्याची मेट्रो रखडली. २०१४ मध्ये केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी मेट्रोस मान्यता दिली, असे मोहोळ यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT