Leshpal Javlagi On Felicitation : पुण्यातील सदाशिव पेठेत मंगळवारी (दि. २७) एक धक्कादायक घटना घडली. एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने तरुणीचा पाठलाग करत तिच्यावर कोयत्याने वार केले. या तरुणाला मात्र लेशपाल चांगदेव जवळगे व हर्षद पाटील या तरुणांनी मोठ्या धाडसाने अडवले. त्यामुळे संबंधित तरुणीचा जीव वाचला. (Latest Marathi News)
लेशपाल व हर्षद या तरुणांनी जीवाची बाजी लावून या आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिले. यावरून या दोघांचेही सर्वत्र कौतुक होत आहे. दरम्यान, या दोघांचेही विविध संघटना, राजकीय पक्षांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दोघांना प्रत्येकी एक लाख रुपयांची बक्षीस जाहीर केले. आता होणाऱ्या सत्कार समारंभाबाबत लेशपाल याने आपली भावना व्यक्त केली आहे. याबाबत त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे.
लेशपाल म्हणाला की, "हात जोडतो, मला आता सत्काराला बोलावू नका. या घटनेनंतर मला खूप फोन येत आहेत. सर्वजण मला सत्काराला बोलावत आहेत. मात्र ती घटना घडली आणि संबंधित मुलाला पोलिसांच्या ताब्यात दिले. यानंतर मी रुमवर गेलो आणि तासभर रडत होतो. थोडा उशीर झाला असता तर तिचा मृत्यू कसा झाला, हे तुम्हाला सांगण्याच माझ्यावर वेळ आली असती. त्या मुलीवरचा हल्ला रोखून मी माझे कर्तव्य बाजावलं आहे."
दरम्यान, संबंधित तरुणीच्या जातीबाबत चर्चा होऊ लागली. यावर लेशपालने सोशल मीडियावर एक पोस्ट केली. त्यात त्याने मुलीच्या जातीवर चर्चा करणाऱ्यांवर सडकून टीका केली. लेशपाल म्हणाला, "त्या मुलीची व मुलाची जात कुठली होती असे मला DM करून विचारणाऱ्या सडक्या बुद्धीजीवांनो विनंती आहे की ते मेसेज डिलिट करा. ना तुम्ही तुमच्या जातीचे होऊ शकता. ना ही समाजाचे. तुमच्या वरच्या थोड्याफार असलेल्या भागाला कीड लागली आहे."
काँग्रेस भवनात लेशपाल चांगदेव जवळगे आणि हर्षद पाटील या दोन धाडसी युवकांचा युवक काँग्रेसच्या वतीने सत्कार करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा आणि शाल देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी त्यातील लेशपाल जवळगे हा तरुण राहुल गांधींच्या 'भारत जोडो' यात्रेत सहभागी झाला होता. तो राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी 'भारत जोडो' यात्रेतून अहिंसेचा केलेल्या प्रचार आणि प्रसारामुळे प्रभावित झाल्याचे लेशपालने सांगितले होते.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.