Chandrakant Patil  Sarkarnama
पुणे

Pune News: पर्यावरणवाद्यांच्या सुचना स्वीकारु, पण दरवेळी विकासात खोडा घालू नका; चंद्रकांत पाटलांनी स्पष्टचं सांगितलं

सरकारनामा ब्युरो

Chandrakant Patil News : "बालभारती ते पौड फाटा रस्त्याबाबत महापालिका प्रशासनाने पर्यावरणवाद्यांच्या सुचना स्वीकारुन त्यांना समजावलं आहे. तसेच त्यांनी आणखी काही सुचना प्रशासनासमोर मांडल्यास त्यावर सामंजस्याने निर्णय व्हायला पाहिजे. पण दरवेळी विकासामध्ये खोडा घालू नये, अशी भूमिका पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडली. तसेच, शहराची वाढती लोकसंख्या आणि गरजा ओळखल्या पाहता त्यादृष्टीने पर्यावरणाचा विचार करुन आवश्‍यक उत्तरेही शोधण्याचे आवाहन त्यांनी केलं आहे. (Don't mess with development every time; Chandrakant Patal made it clear)

चंद्रकांत पाटील म्हणाले की, बालभारती -पौड रस्त्याच्या कामाला महापालिकेकडून गती देण्यात आली असून त्याबाबतची निविदा प्रक्रिया लवकरच सुरु होणार असल्याचे महापालिकेने सांगितले होते. मात्र काही पर्यावरणवाद्यांनी त्यास विरोध केल्यानंतर महापालिका प्रशासनानेही रस्त्याच्या कामाबाबत चर्चा सुरुच असल्याचे सांगितले.

याविषयी पुण्याचे पालकमंत्री पाटील यांना विचारले असता पाटील म्हणाले की,"बालभारती पौड रस्त्याबाबत पर्यावरणवाद्यांना प्रशासनाने वारंवार समजावून सांगितले आहे. प्रशासनाने त्यांच्या काही सुचनाही मान्य केल्या. हा रस्ता इलिव्हेटेड करण्याचा त्यांचा आग्रह होता. त्यामुळे 60 कोटी रुपयांनी बजेट वाढणार होते. महापालिकेनेही त्यांचं म्हणणे मान्य केले.

हा रस्ता जमिनीलगत केला तर अतिक्रमण,फेरीवाले वाढतील. अशा प्रकारे पर्यावरणवाद्यांच्या काही सुचना असतील, तर त्यांनी प्रशासनासमोर मांडाव्यात, त्यांचा नक्की स्विकार केला जाईल, असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं. तसेच, हा रस्ता तयार झाल्यावर वेळ व अंतर मोठ्या प्रमाणात वाचेल.त्यामुळे पर्यावरणवाद्यांचे जे काही म्हणणे आहे, ते त्यांनी प्रशासनासमोर मांडावे. सामंजस्याने निर्णय व्हायला पाहिजे, मात्र विकासामध्ये दरवेळेला खोडा घालणे योग्य नाही, असंही आवाहन त्यांनी यावेळी केलं आहे.

तसेच, शहराची लोकसंख्या आता 60 लाखांच्यावर गेली आहे. 2040 पर्यंत ती लोकसंख्या 90 लाखांपर्यंत जाऊ शकते. त्यामुळे वाढती लोकसंख्या पाहता, पर्यावरणाचा विचार करुन, त्याला आवश्‍यक उत्तर शोधले पाहीजे.'' असे पाटील यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT