Tanaji Sawant Big Statement On MVA Government : मागील वर्षी जून महिन्यात राज्याच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाला होता. एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाला आव्हान देत शिवसेनेतून बंडखोरी केली होती. त्यामुळे उध्दव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि महाविकास आघाडी सरकारला सत्तेतून पायउतार व्हावे लागले.
यानंतर शिंदेसह ४० आमदारांनी भाजपसोबत जात सत्ता स्थापन केली. मात्र, आता शिंदे गटाचे नेते व आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी या सत्तांतराबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.
आरोग्यमंत्री तानाजी सावंत(Tanaji Sawant) हे धाराशिव जिल्ह्यातील परंडा येथे बोलत होते. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील सत्तांतरावर मोठं भाष्य केलं. सावंत म्हणाले, नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणुका लढलो. जनतेने कल ही आमच्या बाजुने दिला. मात्र, उध्दव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. ते सरकार पाडण्यासाठी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे व मी आमदारांचे कॉन्सलिंग करण्यासाठी दीडशे बैठका घेतल्या असल्याचा गौप्यस्फोट डॉ. तानाजी सावंत यांनी केला आहे.
तसेच राज्यात मागील वर्षी झालेला सत्ताबदल हा देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे व मी घडवून आणला आहे असंही सावंत यांनी यावेळी सांगितले. यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
...मातोश्रीचे पुन्हा तोंडही बघणार नाही!
मला मंत्रीपदावरून डावल्यावर धाराशिव जिल्हा परिषदमध्ये मी भाजपसोबत सत्ता स्थापन करून बंड सुरू केले. मातोश्रीवर जाऊन हे सरकार बदल केल्याशिवाय शांत राहणार नाही. परत मातोश्रीचे तोंड ही बघणार नसल्याचे हे मातोश्रीवर जाऊन सांगून आल्याचे वकत्व तानाजी सावंत यांनी केले आहे.
जाणता राजांनी आमच्या युतीत मिठाचा खडा टाकला...
यावेळी आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर बोचरी टीका केली. नरेंद्र मोदी व अमीत शहा यांच्या नेतृत्वात भाजप सेनेला लोकांनी बहुमत दिले असतानाही आमच्या युतीत मिठाचा खडा महाराष्ट्राचे जानते राजे या नावाने भारतभर ओळखले जाणाऱ्यांनी टाकला असल्याचे सांगत तानाजी सावंत यांनी शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्ष टिकास्ञ सोडले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.