Pune News: मागील काही दिवसांपासून शिरुर लोकसभा मतदारसंघ आणि खासदार अमोल कोल्हे चर्चेत आले आहेत. अमोल कोल्हे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा आणि राष्ट्रवादीकडून शिरुर लोकसभेसाठी अनेकजण उत्सुक हे त्यामागची कारणं होती. त्यामुळे राष्ट्रवादी विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांनाच तिकीट देणार की नवीन उमेदवार लोकसभेच्या रिंगणात उतरवणार याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगू लागल्या होत्या. अखेर शिरुर् लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी निश्चित झाली आहे. यानंतर अमोल कोल्हे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
अमोल कोल्हे(Amol Kolhe) यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिरुर लोकसभा उमेदवारीवर भाष्य केलं आहे. कोल्हे म्हणाले, शरद पवारांनी आज राष्ट्रवादीच्या नेत्यांशी-पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी एकूण या कामकाजाचा आढावा घेतला. त्यांना मी मागील चार वर्षांच्या काळातील कामकाजाबद्दल माहिती दिली असं अमोल कोल्हे म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी शरद पवार( Sharad Pawar) साहेबांनी कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. पण अंतिम निर्णय योग्यवेळी ते घेतील. साहेब सांगतील ते धोरण, अन् साहेब बांधतील ते तोरण असंही कोल्हे यांनी यावेळी सांगितलं.
तसेच शिरुर मतदारसंघात( Shirur Lok Sabha Constituency) काही पॅटर्न्स नक्कीच वेगळे आहेत आणि आपण ते मान्य करायला पाहिजे. तसेच कलाक्षेत्रात सक्रिय असताना राजकारणातही सक्रिय असलेलं मी महाराष्ट्राच्या राजकारणातलं पहिलं उदाहरण आहे. त्यामुळे नक्कीच अपेक्षाही जास्तच आहेत आणि उपलब्ध असणारा वेळही तितकाच कमी आहे.
सर्वोत्तम जनसंपर्क काय असू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे विलास लांडे हे आहेत. त्यांच्या या गोष्टीचं मला कायमच अप्रूप वाटत आलं आहे. आगामी काळात ही त्यांची गोष्ट नक्कीच शिकण्यासारखी आहे. मतदारसंघातील नागरिकांच्याच नाहीतर त्यांच्या पै पाहुण्यांविषयी खडा न् खडा माहिती त्यांच्याकडे असते. भविष्यात ही गोष्ट मी त्यांच्याकडून नक्कीच शिकणार आहे.
पवार साहेबांनी माझा लोकसभेतील उपस्थिती, चर्चेतील सहभाग, संसदीय कामकाज, आणि विकासकामं यांचं माझ्या कार्यकाळाच्या आधीच्या १५ वर्षात आणि माझ्या कालावधीतील गेल्या चार वर्षात संसंदीय कामकाजाच्या बाबतीत काय घडलं याचं जर मूल्यमापन केलं तर जवळपास ४७ हजार कोटींचं प्रकल्प शिरुर मतदारसंघात येत आहेत. याचदरम्यान, कलाक्षेत्रातही सक्रिय असल्यानं नक्कीच माझा जनसंपर्क कमी राहिला. पण आता वरिष्ठांनी दिलेल्या सूचना आणि जनसंपर्क वाढवण्यावर आगामी काळात भर देणार असल्याचंही कोल्हे यावेळी म्हणाले.
अजितदादांविषयी नाराजी नव्हती उलट त्यांनी माझी वेळोवेळी पाठराखणच केली होती. त्यांनाही ही परिस्थिती माहिती होती. त्यामुळए अजितदादा, दिलीप वळसे पाटील, विलास लांडे यांच्यासह पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनानुसार आगामी काळात काम करत राहील असंही कोल्हे यावेळी म्हणाले.
विलास लांडे काय म्हणाले ?
शिरुर लोकसभेसाठी अमोल कोल्हे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर इच्छुक उमेदवार विलास लांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लांडे म्हणाले, राष्ट्रवादीकडून अमोल कोल्हेच शिरूर लोकसभा निवडणूक लढणार आहेत. कोल्हेंना पुन्हा निवडून आणण्यासाठी कामाला लागण्याचे आदेश पवारांनी दिले आहेत. अमोल कोल्हेच लोकसभेचे उमेदवार असणार आहेत अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते विलास लांडे यांनी दिली आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.