Shirur Lok Sabha Constituency: राष्ट्रवादी काँग्रेसचं ठरलं! शिरुरमधून अमोल कोल्हेच निवडणूक लढवणार

Amol Kolhe will contest from Shirur : पवार साहेब सांगतील ते धोरण, अन् साहेब बांधतील ते तोरण!
Mp Amol Kolhe
Mp Amol Kolhe Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : शिरुर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस विद्यमान खासदार अमोल कोल्हेंनाच उमेदवारी देणार की नवीन उमेदवार देणार याविषयी राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं होतं. याचदरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनेकजण शिरुर लोकसभा मतदारसंघातील लढण्यासाठी इच्छुक असल्याचंही समोर आलं होतं. मात्र, आता राष्ट्रवादीकडून अमोल कोल्हेच निवडणूक लढविणार असल्याचं समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी कोल्हे यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून आगामी लोकसभा मतदारसंघासाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यात आज(दि.५) आठ लोकसभा मतदारसंघांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक सुरु आहे. यात राष्ट्रवादीकडून लढवण्यात येत असलेल्या शिरुर, नगर दक्षिण, अमरावती यासारख्या मतदारसंघांचा यात आढावा घेतला जात आहे. या मतदारसंघातील पक्षाचे आजी, माजी आमदार, खासदार, पक्षाचे पदाधिकारी आणि इच्छूक या बैठकीला उपस्थित आहेत

Mp Amol Kolhe
NCP Meeting IN Pune : अजितदादांनी कार्यकर्त्यांना दम भरला ; तिकीटावरुन भांडलात तर कानाखाली आवाज काढेन..

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विद्यमान खासदार अमोल कोल्हें(Amol Kolhe)कडून चार वर्षातील कामकाजाचा आढावा घेतला. यानंतर त्यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हे यांना शिरुर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची तयारी करण्याचे आदेश दिले आहेत.

अमोल कोल्हे म्हणाले...

शरद पवारां(Sharad Pawar)नी आज राष्ट्रवादीच्या नेत्यांशी-पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी एकूण या कामकाजाचा आढावा घेतला. त्यांना मी मागील चार वर्षांच्या काळातील कामकाजाबद्दल माहिती दिली असं अमोल कोल्हे म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी शरद पवारसाहेबांनी कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. पण अंतिम निर्णय योग्यवेळी ते घेतील. साहेब सांगतील ते धोरण, अन् साहेब बांधतील ते तोरण! असंही कोल्हे यांनी यावेळी सांगितलं.

Mp Amol Kolhe
Ramtek Loksabha News : राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाचे पाय रोवणे सुरू, कॉंग्रेस अजूनही ढिम्मच...

राष्ट्रवादी(NCP) चे नेते विलास लांडे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भोसरीमध्ये पोस्टरबाजी पाहायला मिळाली. शिरूर लोकसभा मतदारसंघात लांडेंकडून बॅनरबाजी करण्यात आली होती. या बॅनर्सवर विलास लांडे भावी खासदार, असं लिहिण्यात आलं होतं. तर या पोस्टरवर संसदेचा फोटोही होता. त्यामुळे राष्ट्रवादीचा उमेदवार नक्की कोण असणार? याची चर्चा होत होती. मात्र आता लांडे यांनीच अमोल कोल्हे हे उमेदवार असतील अशा सूचना असल्याचं सांगितलं आहे.

अजित पवार काय म्हणाले होते?

अजित पवार यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिरुर लोकसभेसह विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. पवार म्हणाले लोकसभा उमेदवारीस, ज्यांच्यामध्ये इलेक्टिव्ह मेरिट असेल त्यांना संधी मिळेल. मग तो नवीन असेल नाहीतर जुना. आम्ही पक्षाचे सर्व नेते बसून शिरुरमध्ये मार्ग काढू. ज्या जागा महाविकास आघाडीतून राष्ट्रवादीच्या वाट्याला येतील त्या सर्व जागांच्या बाबतीत तोडीस तोड उमेदवार देऊ, असं अजित पवार म्हणाले.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com