Pradeep Kurulkar Case Update
Pradeep Kurulkar Case Update  Sarkarnama
पुणे

Pradeep Kurulkar News: कुरूलकरांची कोठडी वाढली; 'एटीएस'च्या हाती लागला चौथा मोबाईल, आणखी रहस्य उलगडणार

सरकारनामा ब्यूरो

DRDO director Pradeep Kurulkar : पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेला गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोपावरुन अटकेत असलेले 'डीआरडीओ'चे संचालक डॉ.प्रदीप कुरुलकर यांना पुण्यातील विशेष एटीएस न्यायालयाने मंगळवारपर्यंत (दि.16 मे) एटीएस कोठडी सुनावणी आहे.

देशाच्या संरक्षण क्षेत्रातील गोपनीय माहिती पाकिस्तानला देण्याच्या आरोपावरून एटीएसने प्रदीप कुरुलकर यांना काही दिवसांपूर्वी अटक केली. त्यानंतर न्यायालयाने कुरुलकरांना 15 मे पर्यंत एटीएस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. मात्र, आज त्यांच्या कोठडीची मुदत संपल्याने कुरुलकरांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने उद्यापर्यंत एटीएस कोठडी सुनावली आहे.

एटीएसने आतापर्यंत केलेल्या चौकशीत अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. प्रदीप कुरुलकर यांना पाकिस्तानमधून काही मेल आले होते. त्या मेलला त्यांनी प्रतिसाद दिल्याचं समोर आलं आहे. तसेच पाकिस्तानी मेल आयडीवर मेल केल्याचे एटीएसने केलेल्या तपासातून पुढे आले आहे.

कुरूलकर यांच्यासह भारतीय गुप्तचर खात्यामध्ये कार्यरत असणाऱ्या एका अधिकाऱ्यालाही हनीट्रॅपमध्ये अडकवल्याचं तपासात समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. मात्र, आता या प्रकरणात आणखी धक्कादायक बाब समोर आली आहे.

या हनीट्रॅप प्रकरणात वायुदलाचा अधिकारीही अडकल्याची माहिती समोर आली आहे. याबाबतीत एटीएसने जबाब नोंद केला असून एअर फोर्सकडून या अधिकाऱ्याची चौकशी करण्यात येत आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, प्रदीप कुरुलकर यांच्याकडून चार मोबाईल फोनचा वापर सुरू होता. त्यापैकी एका मोबाईलचा लॉक उघडला जात नव्हता. फॉरेन्सिक लॅबोरेटरीला देखील त्या मोबाईलचा लॉक उघडण्यास अपयश येत होतं.

अखेर कुरुलकरांनी स्वतः त्या मोबाईलचा लॉक उघडून दिला असल्याची माहिती समोर येत आहे. त्यानंतर आता या मोबाईलमधील डेटाच्या संदर्भातील चौकशी एटीएसकडून करण्यात येणार आहे. त्यामुळे या प्रकरणात काय- काय रहस्य उलगडतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

दरम्यान, डीआरडीओ'चे संचालक डॉ.प्रदीप कुरुलकर हे पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या जाळ्यात कसे सापडले? त्यांनी काय-काय माहिती दिली? यासह यामध्ये अजून कोणाचा सहभाग आहे का? याबाबतची कसून चौकशी एटीएसकडून करण्यात येत आहे.

(Edited By- Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT