Pradeep Kurulkar Case Update : कुरुलकरांनंतर आता वायुदलाचा अधिकारीही 'हनीट्रॅप'चा शिकार; 'एटीएस'चा धक्कादायक खुलासा

Pradeep Kurulkar News: प्रदीप कुरुलकर हे सध्या एटीएसच्या कोठडीत असून त्यांची सध्या कसून चौकशी करत आहेत.
DRDO Pradeep Kurulkar :
DRDO Pradeep Kurulkar :Sarkarnama
Published on
Updated on

Pune : संरक्षण संशोधन व विकास संस्थेचे शास्त्रज्ञ प्रदीप कुरूलकर यांच्या एटीएस चौकशीदरम्यान अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. प्रदीप कुरूलकर यांच्यासह तर भारतीय गुप्तचर खात्यामध्ये कार्यरत असणाऱ्या एका अधिकाऱ्यालाही हनीट्रॅपमध्ये अडकवण्याचं तपासात समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. मात्र, आता या प्रकरणात आणखी धक्कादायक बाब समोर आली आहे. या हनीट्रॅप प्रकरणात वायुदलाचा अधिकारीही अडकल्याची माहिती समोर आली आहे.

प्रदीप कुरुलकर हे सध्या एटीएसच्या कोठडीत असून त्यांची सध्या कसून चौकशी करत आहेत. प्रदीप कुरुलकर यांना हनीट्रॅपमध्ये अडकवून पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणांनी त्यांच्याकडून भारताविषयीची गोपनीय माहिती काढून घेतल्याचे वृत्त समोर आले होते. प्रदीप कुरुलकर यांना ज्या महिलेने हनीट्रॅपमध्ये अडकवले तिने गुप्तचर खात्यातील एका अधिकाऱ्याशीही संपर्क साधला होता. प्रदीप कुरुलकर यांच्या चौकशीदरम्यान ही माहिती समोर आली आहे. आता हवाईदलाचा अधिकारी असलेला निखील शेंडेही पाकिस्तानी(Pakistan) गुप्तचर यंत्रणेच्या संपर्कात असल्याचं एटीएसच्या तपासात समोर आलं आहे.

DRDO Pradeep Kurulkar :
Shevgaon News: शेवगावमध्ये घडलेला प्रकार दुर्दैवी, दोषींवर कारवाई होणार; पालकमंत्री विखे पाटलांचा इशारा

प्रदीप कुरूलकर(Pradeep Kurulkar) यांना हनीट्रॅपमध्ये अडकवण्यात आले असले तरी संबंधित महिलेने त्यांना ब्लॅकमेल केले नव्हते. या महिलेने कुरुलकर यांच्याशी प्रेमाने आणि गोडगोड बोलून माहिती काढून घेतली. 'मला भारतीयांचा अभिमान आहे. तुम्ही चांगले शास्त्रज्ञ आहात. मी पण भारतीय आहे. तुम्ही ज्या क्षेत्रात काम करत आहात, त्याच क्षेत्रात मलाही देशासाठी काहीतरी करायचं आहे', असे ही महिला कुरुलकर यांना सांगत होती. याचदरम्यान बोलण्यात गुंतवून गोडीगुलाबीने महिलेने ब्राह्मोस, अग्नी यासारख्या भारताच्या क्षेपणास्त्रांविषयीची गोपनीय माहिती कुरूलकर यांच्याकडून काढून घेतल्याचा संशय आहे.

DRDO Pradeep Kurulkar :
Karnataka Election Result 2023 : नावात काय आहे ? ; नामसाधर्म्यामुळं काँग्रेसचा केवळ सोळा मतांनी पराभव..; भाजपची खेळी ?

एटीएस(ATS)चा जो अधिकारी महिलेच्या संपर्कात आला होता, त्यानेदेखील कोणती गोपनीय कागदपत्रं पाकिस्तानला दिली आहेत का, याचा शोध एटीएसकडून घेतला जात आहे. दरम्यान, एटीएसच्या अधिकाऱ्यांकडून आतापर्यंतच्या चौकशीत समोर आलेली माहिती पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांना दिली आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com