Drug Mafia Lalit Patil Sarkarnama
पुणे

Drug Mafia Lalit Patil : ललित पाटील प्रकरणात मोठी कारवाई; ससून रुग्णालयातील कर्मचाऱ्याला अटक

Ganesh Thombare

Pune News : गेल्या काही दिवसांपासून ड्रग्जमाफिया ललित पाटील प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे. आता या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. ससून रुग्णालयातील कर्मचारी महिंद्र शेवते याला पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

ललित पाटील पुण्याच्या ससून रुग्णालयातून पसार झाल्याप्रकरणी दोन पोलिसांना काही दिवसांपूर्वीच अटक करण्यात आली होती. ललित पाटील ससून रुग्णालयात उपचार घेत असताना नियुक्तीवर असलेल्या दोन पोलिसांवर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. तसेच या प्रकरणात दोषी असलेल्या अनेक आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आता ससून रुग्णालयातील कर्मचारी महेंद्र शेवते याला गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे. ललित पाटील ससून रुग्णालयात उपचार घेत असताना कर्मचारी महेंद्र शेवते याने ललित पाटीलला मदत केल्याचा आरोप या कर्मचाऱ्यावर आहे. तसेच ललितला रुग्णालयातून पसार होण्यामध्येही शेवते याची महत्त्वाची भूमिका असल्याचा संशय पोलिसांना आहे.

दरम्यान, काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी या प्रकरणासंदर्भात भाष्य करत ससून रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचारी दोषी असल्याचा आरोप केला होता. तसेच त्यांच्यावर काहीच कारवाई झाली नसल्याचेही त्यांनी म्हटले होते.

ललित पाटील प्रकरणाचा तपास संथ गतीने सुरू असून, मुख्य आरोपीची पाठराखण करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप धंगेकरांनी केला होता. यानंतर आता ससून रुग्णालयातील कर्मचारी महेंद्र शेवते याला पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे शेवते यांच्या चौकशीनंतर या प्रकरणात आणखी कोणाकोणाची नावं समोर येतात, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

(Edited By - Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT