Lalit Patil Drugs Case: ललित पाटील प्रकरणात मोठी माहिती समोर; आणखी चार आरोपींची नावे निष्पन्न

Lalit Patil News: राज्यातील विविध शहरात अमली पदार्थांचे उत्पादन व वितरण करण्यासाठी टोळी कार्यरत असल्याची माहिती समोर
Lalit Patil News
Lalit Patil NewsSarkarnama
Published on
Updated on

Pune News: गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या ड्रग्जमाफिया ललित पाटील प्रकरणात आता मोठी माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी ड्रग्जप्रकरणी ललित पाटीलला मुंबई पोलिसांनी अटक केली. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू असून, पोलिस कसून चौकशी करत आहेत.

यातच आता ललित पाटील प्रकरणात आणखी चार जणांची नावे निष्पन्न झाली आहेत. हे सर्व आरोपी सध्या वेगवेगळ्या कारागृहात आहेत. आता त्यांना प्रॉडक्शन वॉरंटद्वारे मंगळवारी पुण्यात आणले जाणार आहे, अशी माहिती मिळत आहे.

ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आलेले आणि सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपींना मोक्कानुसार पुन्हा ताब्यात घेण्यात येत आहे. राज्यातील विविध शहरात अमली पदार्थांचे उत्पादन व वितरण करण्यासाठी टोळी कार्यरत असून, अरविंदकुमार लोहरे हा या टोळीचा प्रमुख असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. त्याने ललित पाटीलला येरवडा कारागृहात मेफेड्रान बनविण्याचे सूत्र दिले होते, असे आतापर्यंतच्या तपासातून निष्पन्न झाले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Lalit Patil News
Lalit Patil News : ड्रग्ज तस्कर ललित पाटीलला पळून जाण्यासाठी मदत करणारा दत्ता डोके अटकेत

नव्याने नावे समोर आलेल्या आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पुणे पोलिसांचे पथक आरोपी असलेल्या शहरात रवाना झाले आहे. प्रॉडक्शन वॉरंटद्वारे त्यांना मंगळवारी येथील मोक्का न्यायालयात हजर केले जाणार आहे. या गुन्ह्यात अटक असलेले आधीचे आरोपी आणि नव्याने अटक करण्यात येणाऱ्या चौघांची समोरासमोर चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती सरकारी वकिलांनी दिली आहे.

टोळी प्रमुख आणि इतर आरोपींनी संगनमत करून कशा प्रकारे मेफेड्रॉनचा कारखाना सुरू केला ? कारखाना सुरू करण्यासाठी आवश्यक साहित्य आणि आर्थिक पाठबळ कसे मिळवले?, कारखाना सुरू करून मेफेड्रॉनचे उत्पादन, वाहतूक आणि विक्री कशी केली ? मेफेड्रॉन विक्रीतून आलेल्या पैशाचा वापर कशाप्रकारे केला ? याबाबत टोळी प्रमुख लोहरे आणि टोळीतील इतर सदस्यांची समोरासमोर चौकशी करण्यात येणार आहे.

ललित पाटील अन् तिघांच्या मोक्का कोठडीत वाढ

पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने ललित पाटील, रोहन चौधरी आणि शिवाजी शिंदे यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. या वेळी त्यांच्या कोठडीत न्यायालयाने सात दिवसांची वाढ केली . आरोपींच्या वकिलांनी आरोपींच्या मोक्का कोठडीत वाढ करण्यास विरोध केला.

मागील वेळी ज्या कारणांसाठी कोठडीची मागणी केली होती, तीच कारणे या वेळीदेखील देण्यात आली, असा युक्तिवाद बचाव पक्षाकडून करण्यात आला. नवीन आरोपींची नावे आत्ता समोर आली आहेत. त्यामुळे सर्वांची समोरासमोर चौकशी करणे गरजेचे असल्याचे ॲड. साळवी यांनी न्यायालयाला सांगितले.

Edited by : Ganesh Thombare

Lalit Patil News
Lalit Patil Arrested : ड्रग्ज तस्कर ललित पाटीलला अटक; मुंबई पोलिसांची कारवाई

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com