Drug Mafia Lalit Patil Sarkarnama
पुणे

Drug Mafia Lalit Patil: ललित पाटील प्रकरणात मोठी कारवाई; दोन पोलिसांना अटक

Pune Police : या ड्रग्ज प्रकरणात काही दिवसांपूर्वीच आणखी चार जणांची नावे निष्पन्न झाली आहेत.

Ganesh Thombare

Pune News: राज्यात गेल्या काही दिवसांपासून ललित पाटील प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे. ड्रग्ज प्रकरणात ललित पाटीलसह आणखी काही आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे. तर काही दिवसांपूर्वीच या ड्रग्ज प्रकरणात आणखी चार जणांची नावे निष्पन्न झाली आहेत. हे सर्व आरोपी सध्या वेगवेगळ्या कारागृहात असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. मात्र, आता याच प्रकरणात दोन पोलिसांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे.

ड्रग्ज माफिया ललित पाटील पुण्याच्या ससून रुग्णालयातून पसार झाल्याप्रकरणी दोन पोलिसांना अटक करण्यात आली आहे. ललित पाटील ससून रुग्णालयात उपचार घेत असताना नियुक्तीवर असलेल्या दोन पोलिसांवर कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. तसेच ललित पाटीलला पळून जाण्यास मदत केल्याचा ठपकाही त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. नाथाराम काळे आणि अमित जाधव अशी अटक करण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ललित पाटील अमली पदार्थ विक्री करत असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. यानंतर पोलिसांनी 30 सप्टेंबरला ललित पाटीलच्या साथीदारासह एकाला अटक केली होती. पण त्यानंतर 2 ऑक्टोबरला ललित पाटील पोलिसांना गुंगारा देऊन रुग्णालयातून पसार झाला होता.

राज्य सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेत दोषी आढळलेल्यांवर कारवाई करण्याचा इशारा राज्याच्या गृहमंत्र्यांनी दिला होता. त्यानंतर या प्रकरणात पोलिसांनी तातडीने चौकशी सुरू करत या प्रकरणातील आरोपींना ताब्यात घेतले. पण चौकशीनंतर दोषी आढळलेल्या बंदोबस्तावरील एक सहायक निरीक्षक, दोन पोलिस उपनिरीक्षक आणि सात पोलिस कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले होते.

यानंतर आता शुक्रवारी ललित पाटील याला पसार होण्यास मदत केल्याचा ठपका ठेवत दोन पोलीस कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, ड्रग्स माफिया ललित पाटीलला मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर "मी पळून गेलो नव्हतो, तर मला पळवलं गेलं होतं, मला पळवण्यात कुणाचा हात आहे, हे सर्व मी सांगणार आहे", असा धक्कादायक दावा ललित पाटीलने केला होता. सध्या या प्रकरणाची कसून चौकशी सुरु असून या प्रकरणात आणखी कोणाकोणाची नावं समोर येतात, हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

Edited by Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT