DSK sarkarnama
पुणे

DSK Row: डीएसकेंकडून गुंतवणूकदारांच्या फसवणूक प्रकरणात चुकीची माहिती आली होती समोर? पोलिसांचा हायकोर्टात खुलासा

DSK Row: आरोपींनी फसवणुकीतून स्थावर मालमत्ता खरेदी केल्याचेही पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. संबंधितांचे बँक रेकॉर्ड आणि आर्थिक व्यवहार तपासल्यानंतर प्रत्यक्ष फसवणुकीची रक्कम समोर आली आहे.

Amit Ujagare

DSK Row: डी. एस. कुलकर्णीच्या विविध कंपन्यांच्या माध्यमातून आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून गुंतवणूक योजनांच्या माध्यमातून ११ हजारांहून अधिक नागरिकांची सुमारे ६१० कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती पुणे पोलिसांनी तपासाअंती उच्च न्यायालयात सादर केली आहे.

या प्रकरणात सुरुवातीला नागरिकांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारींमध्ये फसवणुकीची रक्कम सुमारे १ हजार ३०० कोटी रुपयांच्या घरात असल्याचे समोर आले होते. मात्र, आरोपींनी फसवणुकीतून स्थावर मालमत्ता खरेदी केल्याचेही पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. संबंधितांचे बँक रेकॉर्ड आणि आर्थिक व्यवहार तपासल्यानंतर प्रत्यक्ष फसवणुकीची रक्कम समोर आली आहे.

कोथरूड येथील एका ६५ वर्षीय व्यक्तीच्या तक्रारीवरून २८ ऑक्टोबर २०१७ मध्ये शिवाजीनगर पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहिता आणि कायद्यानुसार १९ जणांवर 'एमपीआयडी' 'डीएसकें'सह फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाच्या तपासाबाबत पोलिसांनी उच्च न्यायालयात नुकतीच माहिती दिली आहे.

तपासादरम्यान ११ हजार २१३ गुंतवणूकदार फसवणुकीला बळी पडल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपींनी विविध कंपन्या आणि गुंतवणूक योजना सुरू करून नागरिकांना मोठ्या परताव्याचे आमिष त्यानंतर दाखविले. गुंतवणूकदारांकडून कोट्यवधी रुपये जमा करून त्यातील रक्कम इतर सहकारी कंपन्यांमध्ये वळविल्याचे तपासात समोर आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT