Shehzad Poonawalla: भाजपला अचानक रामराम करणारा नेता काँग्रेसमध्ये जाणार? पण ठेवली खळबळजनक अट; भाजप सोडण्याचं कारणही सांगितलं

Shehzad Poonawalla May be enter in Congress : भाजपतून अचानक राजीनामा दिल्यानंतर हा नेता चर्चेत आला असून पक्षाकडं या नेत्यानं राजीनामा मंजूर करण्याची आग्रही मागणी केली आहे.
Shehzad Poonawalla
Shehzad PoonawallaSarkarnama
Published on
Updated on

Shehzad Poonawalla May be enter in Congress : भाजपतून अचानक राजीनामा दिल्यानंतर हा नेता चर्चेत आला असून पक्षाकडं या नेत्यानं राजीनामा मंजूर करण्याची आग्रही मागणी केली आहे. पण यानंतर आता हा नेता काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. याबाबत स्वतः त्या नेत्यानं भाष्य केलं आहे, पण त्यासाठी एक खळबळजनक अटही ठेवली आहे. तसंच भाजप सोडण्याचं नेमकं कारणही या नेत्यानं सांगितलं आहे.

Shehzad Poonawalla
Ritu Tawde : मुंबईकारांचा पैसा प्रसिद्धीसाठी उडवणार! महापौर रितू तावडेंच्या सोशल मीडियासाठी 25 लाख खर्च करणार? खरं काय ते स्वतःच सांगितलं

शहजाद पूनावाला असं या नेत्याचं नाव आहे. भाजपत त्यांच्यावर प्रवक्तेपदाची जबाबदारी होती, दोन दिवसांपूर्वी पूनावाला यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. तत्पूर्वी काही दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या पदाचाही राजीनामा दिला होता. पण तेव्हा ते पक्षाला रामराम करतील असं वाटलं नव्हतं, पण पक्षानं आपला आधीचा राजीनामा स्विकारला नव्हता त्यामुळं आता पुन्हा राजीनामा दिला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पण हा पण राजीनामा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नीतीन नबीन यांनी अद्यापही स्विकारलेला नाही.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पूनावाला यांनी मुक्तपणे आपल्या राजकारणाबाबत चर्चा केली आहे. आपण भाजप का सोडली याचं नेमकं उत्तरंही त्यांनी दिलं आहे. सध्याच्या त्यांच्या आर्थिक स्थितीबाबतही त्यांनी भाष्य केलं असून काँग्रेसमध्ये प्रवेशाच्या प्रश्नावरही स्पष्टीकरण दिलं आहे. पूनावाला यांनी यापूर्वीही आपल्या आर्थिक आणि व्यक्तिगत अडचणींबाबत खुलेपणानं सांगितलं आहे. एनडीटीव्हीला दिलेल्या एका ताज्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं की, "राजकीय पक्ष आपल्या कार्यकर्त्यांना मानधन देत नाहीत. त्यामुळं मलाही घराचं भाड द्यावं लागतं, मी भाजपत काम करतो म्हणून माझा घर मालक मला मोफत राहायला जागा देणार नाही. तो १ तारखेला घरभाड मागतो, राजकीय पक्ष कार्यकर्त्यांना पैसे देत नाहीत"

तुम्ही जेव्हा एखाद्या राजकीय आंदोलनाशी जोडले जाता, तेव्हा ती एक नोकरी असते. तुम्ही कार्यकर्ते होता कारण तुम्हाला त्या राजकीय पक्षाची विचारधारा पटलेली असते किंवा त्या संघटनेप्रती तुम्हाला प्रेम असतं. या सर्व तिन्ही गोष्टी माझ्याबाबत खऱ्या होत्या. भाजपचा राजीनामा देण्याचा निर्णय मी अचानक घेतला नव्हता. २०२४ पासूनच आपण भाजप सोडण्याचा वचार करत होतो. मी याबाबत आमच्या नेत्यांकडं इच्छा व्यक्त केल्यानंतर अनेकांनी माझ्याशी संपर्क साधला होता. पण आपली आर्थिक स्थिती ठीक नसल्यानं आपण भाजप सोडण्याचा निर्णय घेतला.

काँग्रेस प्रवेशावर काय म्हणाले पूनावाला?

भाजप सोडल्यानंतर आता पुन्हा काँग्रेसमध्ये जाणार का? या प्रश्नाचं उत्तर देताना पूनावाला म्हणाले, "मी काँग्रेसमध्ये सहभागी होईल, पण एका अटीवर. राहुल गांधींना, सोनिया गांधींना, प्रियांका गांधींना काँग्रेसमधून हटवा त्यानंतरच मी काँग्रेसमध्ये सामिल होईल. नेहरुंच्या कामांबाबत माफी मागा" पूनावाला यांच्या या अजब अटींमुळं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. पण मजेशीर बाब म्हणजे शहजाद पुनावाला हे २०२१ मध्ये काँग्रेस पक्ष सोडून भाजपत दाखल झाले होते.

भाजपसोबत राहणार का?

शहजाद पूनावाला यांनी म्हटलं की, ते वैचारिकदृष्ट्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कायम संपर्कात राहील. मी राहुल गांधींसारखा भविष्यातील वक्ता नाही. पण मी हे सांगू शकतो की, पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखा नेता या देशात कधी झाला नाही आणि कोणी भविष्यात होणारही नाही. पण जगातील सर्वात मोठ्या लोकांच्या पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदावर काम केल्यानंतर तुम्हाला वाटतं का? मी इतर कुठल्या पक्षाशी जोडलोजाईल. या क्षणी भाजपात भाजपचं सर्वांत चांगला पक्ष आहे.

Shehzad Poonawalla
Mamata Banerjee news : विधानसभेतील पराभवानंतरही ममतादीदींचा करिष्मा कायम; बार कौन्सिलच्या निवडणुकीत भाजपचा धुव्वा

राजीनामा पत्रात काय लिहिलं?

शहजाद पूनालावाला यांनी पत्रात लिहिलं की, गेल्या काही दिवसांपासूनच्या घडलेल्या घटना तसंच व्यक्तींबाबत मी तुम्हाला आधीच सविस्तर बोललो आहे. मला माझ्या आधीच्या निर्णयावर ठाम राहण्यासाठी बांधून ठेवलं आहे. ज्याप्रकारे मी आधीच म्हटलं होतं की, अत्यावश्यक आर्थेक व वैयक्तिक परिस्थींमुळं मी आता खासगी क्षेत्रात प्रवेश करणार आहे. पण जिथं शक्य असेल तिथे मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचा दृष्टीकोन आणि कार्याचं समर्थन करत राहील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com