Chagan Bhubal
Chagan Bhubal arkarnama
पुणे

काहींच्या विरोधामुळे पुणे पालिकेत फुलेंच्या पुतळ्यासाठी ४४ वर्षे वाट पाहावी लागली

सरकारनामा ब्युरो

पुणे : महात्मा फुले यांचा पुतळा त्यावेळच्या पुणे नगरपालिकेत बसविण्याची मागणी करणारा ठराव त्यावेळेचे कॉंग्रेसचे नेते केशवराव जेधे यांनी १९२५ मांडला. मात्र, त्यावेळी काही लोकांनी या ठरावाला विरोध केला. त्यामुळे महात्मा फुले यांचा पुतळा प्रत्यक्षात येण्यास तब्बल ४४ वर्ष वाट पाहावी लागली, अशी आठवण अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी आज सांगितली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती भव्य पुतळ्याचे अनावरण आज राज्यपाल व विद्यापीठाचे कुलपती भगतसिंग कोश्‍यारी यांच्या हस्ते पुणे विद्यापीठात आज झाले. यावेळी भुजबळ बोलत होते.भुजबळ म्हणाले, ‘‘ सावित्रीबाईंच्या देशातल्या सर्वात मोठ्या पुतळ्याचे अनावरण आज झाले.हा दिवस माझ्यासाठी ऐतिहासिक आहे. मात्र, कॉंग्रेसचे नेते केशवराव जेधे यांनी पुणे महापालिकेत महात्मा फुले यांचा पुतळा उभारण्याची मागणी १९२५ साली केली. मात्र, त्यावेळी काही लोकांनी त्यास विरोध केला. त्यामुळे त्या काळात पुतळा उभा राहू शकला नाही. अनेक प्रयत्नांनंतर १९६९ साली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते पुणे महापालिकेतील पुतळ्याचे अनावरण झाले.’’

विद्यापीठात आज सावित्रीबाईंच्या पुतळ्याचे अनावरण झाले. मात्र, पुण्यात ज्या भिडे वाड्यात सावित्रीबाईंनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली त्या भिडे वाड्यात स्मारकाचे काम पूर्ण करण्यात येईल, भुजबळ यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘ भिडे वाड्यातील स्मारक, समता भूमीच्या परिसरातील उर्वरित स्मारकाचे काम तसेच सावित्रीबाईंच्या नायगाव येथील जन्मगावातील विकसाकाची काही कामे बाकी आहेत. या सर्व कामांच्या संदर्भात उद्या मुंबईत बैठक घेण्यात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत स्मारकाची लांबलेली कामे पुढे नेण्यासाठी निर्णय घेण्यात येतील.’’

पुतळ्याचे अनावरण तीन जानेवारीला करण्यात येणार होते. मात्र, काही कारणाने या कार्यक्रमाला उशीर झाला.पुतळा उभारण्याच्या कामातील प्रवासाची माहिती भुजबळ यांनी दिली. विद्यापीठांच्या कामात जातीय, धार्मिक रंग देऊन कुणीही विखार पसरवू नये, असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते.

Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT