Ajit Pawar and Eknath Shinde
Ajit Pawar and Eknath Shinde Sarkarnama
पुणे

दसरा मेळावा शिवसेनेचा की शिंदे गटाचा? अजित पवार म्हणाले...

सरकारनामा ब्यूरो

पुणे: शिवसेना आणि एकनाथ शिंदे गट यांच्यात दसरा मेळाव्यावरून जोरदार वाद सुरू आहे. परवानगी मिळाली काय किंवा नाही मिळाली तरी शिवाजी पार्कवर दसरा मेळावा हा शिवसेनेचाच होणार आणि आम्ही ती कोणत्याही परिस्थितीत घेणारच, असा आक्रमक पवित्रा शिवसेनेच्या (Shiv Sena) नेत्यांकडून घेण्यात आला आहे. तर शिंदे (Eknath Shinde) गटाने देखील शिवाजी पार्कवरच दसरा मेळावा घेणार, अशी भूमिका घेतली आहे. आता शिवाजी पार्कवर नेमका कोणाचा दसरा मेळावा होणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. यावर आता राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रीयी दिली आहे. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याचा मान हा बाळासाहेब ठाकरे यांच्याच शिवसेनेचा असल्याचं,अजित पवार यांनी म्हटलं आहे.

अजित पवार म्हणाले, खरं पाहिलं तर हा वाद निरर्थक आहे. दोन्ही गटांनी आपआपल्या परीने दसरा मेळावा घ्यावा. खर पाहिलं तर हा मान बाळासाहेबांच्याच शिवसेनेचा आहे. आता इथून पुढे उद्धव ठाकरे हेच शिवसेनेचं नेतृत्व करतील, असं बाळासाहेबांनी शिवाजी पार्कवरून सांगितंले होतं. हे आपण सर्वांनीच ऐकलं आहे. त्यामुळे शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याचा मान हा शिवसेनेचाच असल्याचे अजित पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान त्यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना बारामती मतदारसंघाच्या मुद्दयावरून सुनावले आहे. "ही बारामती आहे. बारामतीकरांना चांगलं माहीत आहे की, कोणतं बटन दाबायचं. ते योग्यवेळी योग्य निर्णय घेतील. बारामतीकरांना माझं काम माहीत आहे. उगाच बारामतीला धडका घेऊ नका, डिपॉझिट जप्त होईल, असा इशाराच अजित पवार यांनी फडणवीसांना दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT