मतभेद विसरुन आदित्य ठाकरे अन् चंद्रकात पाटील बनले बाप्पाच्या पालखीचे भोई!

Ganesh Visarjan : पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीस राजकीय मंडळींनी हजेरी लावली आहे.
Aditya Thackeray & Chandrakant Patil Latest News
Aditya Thackeray & Chandrakant Patil Latest News Sarkarnama
Published on
Updated on

पुणे : कोरोना प्रादुर्भाव असल्याने गेली दोन वर्ष गणेशोत्सव खुलेपणाने साजरा करता आला नव्हता. मात्र यंदा कुठलेही निर्बंध नसल्याने मोठ्या उत्साहात साजरा झाला. १० दिवस मनोभावे बाप्पाची सेवा करून आज (ता.९ ऑगस्ट) आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात येत आहे. मात्र, आगामी पालिका निवडणुका पाहता यंदाच्या पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीस राजकीय मंडळींनी हजेरी लावली आहे. (Aditya Thackeray & Chandrakant Patil Latest Ganesh Visarjan News)

Aditya Thackeray & Chandrakant Patil Latest News
Ganesh Visarjan Live 2022 : अंबादास दानवेंनी लुटला ढोल वाजविण्याचा आनंद

दरम्यान, राजकीय विरोधक असलेले नेतेही या निमित्ताने एकत्र बघायला मिळत आहे. आज पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीच्या निमित्ताने भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील आणि शिवसेने नेते आणि माजी आदित्य ठाकरे हे समोरासमोर आले. यावेळी त्यांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवत पालखी सोबत खांद्यावर घेतली. यावेळी गणेशभक्तांनी जोरात गणपती बाप्पा मोरया,अशा घोषणा दिल्या.

Aditya Thackeray & Chandrakant Patil Latest News
Pune Ganesh Festival : पुण्याला महापौर नाहीत, मग विसर्जन मिरवणुकीचा मानकरी कोण?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यावर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आहे. यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली असून यासाठी भाजपने शिंदेंना मदत केली हे उघड गुपित आहे. यामुळे ठाकरे आणि भाजप नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध रंगत आहे. दरम्यान भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि ठाकरे एकत्र दिसणं दुर्मिळच. मात्र,असे गणेश विसर्जन मिरवणुकीच्या निमित्ताने आज घडले आहे. मात्र दोघांनीही यावेळी राजकीय मतभेद बाजूला ठेवत गणरायांच्या मिरवणुकीत हसतमुखाने सहभाग घेतलेला उपस्थितांनी अनुभवला.

आदित्य ठाकरे गणपती विसर्जनासाठी पुण्यामध्ये दाखल झाले. त्यावेळी तरुणींचा गराडा त्यांच्याभोवती पडला होता. अनेकजण त्यांच्यासोबत फोटो घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. जमलेल्या तरुणी 'आदित्य आदित्य' म्हणत जल्लोष करत होत्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com