Pune News | शिक्षणमंत्री मा. भुसे काका, लाडक्या विद्यार्थ्यांचा 'हा' संभ्रम तुम्ही दूर करा अशी मागणी करणारे काही बॅनर पुणे शहरात झळकले आहेत. हे बॅनर सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने राज्यभरात त्याची चर्चा जोरात आहे. या बॅनरमधून विद्यार्थ्यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांना काही सवाल करत आमचा संभ्रम दूर करा अशी आर्त साद घातली आहे.
शिक्षण विभाग आणि राज्य मुख्याध्यापक संघाने वेगवेगळी वेळापत्रके प्रसिद्ध केल्यामुळे कोणत्या वेळापत्रकानुसार परीक्षा द्यायची याबाबत विद्यार्थ्यांसह पालकांचा संभ्रम उडाला आहे. दोन्ही वेळापत्रकांमधील तारखा वेगवेगळ्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर पुण्यात काही चौकांमध्ये शिक्षणमंत्री भुसे काका, लाडक्या विद्यार्थ्यांचा संभ्रम दूर करा, अशा आशयाचे बॅनर युवासेनेचे सहसचिव कल्पेश यादव यांनी लावले आहेत.
सुरुवातीला राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने( SCERTM)राज्यातील सर्व शाळांनी वार्षिक परीक्षा आणि पॅट परीक्षा घ्याव्यात, असे प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध केलं. त्यानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाने वार्षिक परीक्षांचे नवीन वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे नक्की कोणतं वेळापत्रक ग्राह्य धरायचं यावरुन विद्यार्थी आणि पालक संभ्रमात पडले आहेत.
राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यात लक्ष घालतील का? विद्यार्थी पालकांमधील गोंधळ दूर करतील का?, SCERTM आपले वेळापत्रक मागे घेणार की मुख्याध्यापक संघ आपले वेळापत्रक मागे घेणार ? दोन वेगवेगळ्या वेळापत्रकामुळे विद्यार्थी, पालक व शिक्षकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे, असे कल्पेश यादव यांचे म्हणणे आहे.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र विभागाने ८ ते २५ एप्रिलदरम्यान परीक्षा घेण्याचे आदेश दिले आहेत. ८ एप्रिलपासून आठवी व नववीच्या, १९ एप्रिलपासून सहावी व सातवीच्या, ९ एप्रिल पासून पाचवीच्या, २२ एप्रिलपासून तिसरी व चौथीच्या तर २३ एप्रिलपासून पहिली व दुसरीच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. तर १ मे रोजी निकाल जाहीर करण्याची अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे.
दुसऱ्या बाजूला मुख्याध्यापक संघाने प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकानुसार, ३ ते २४ एप्रिल दरम्यान परीक्षा घेण्यात येणार आहेत.
शिक्षणमंत्री मा. भुसे काका, लाडक्या विद्यार्थ्यांचा हा संभ्रम तुम्ही तरी दूर करा...
कोलमडलेल्या शैक्षणिक वेळापत्रकामुळे आम्हा विद्यार्थी, पालक, शिक्षकांच्या मानसिकतेचा विचार कोणी करणार का?
गुणवत्ता राखली जाणार का?
एससीईआरटीचे म्हणणे एक, मुख्याध्यापक संघाचे दुसरेच
पालकांनाच प्रश्न पडलाय आमचे पालक कोण?
शिक्षणातील हा सावळा गोंधळ तुम्ही दूर करा ....
आपले नम्र : समस्त विद्यार्थी व पालक, शिक्षक
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.