Eknath Khadse,  devendra fadnavis
Eknath Khadse, devendra fadnavis sarkarnama
पुणे

खडसें करणार राजकीय भूंकप ; ती सीडी उडवणार विरोधकांची झोप

सरकारनामा ब्युरो

पुणे : राष्ट्रवादी कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी ''माझ्या मागे ईडी लावली तर सीडी बाहेर काढीन,'' असे विधान केले होते. त्याच्या या विधानानंतर खडसेंची ईडीकडून चौकशी करण्यात आली. मात्र, बोलल्याप्रमाणे खडसे यांनी सीडी अद्याप लावलेली नाही. आता मात्र, खडसेंनी सीडी लावण्याबाबत भाष्य केले आहे. त्यामुळे खडसेंच्या त्या सीडीमुळे राजकीय भूकंप होणार असल्याची चर्चा आहे. पुण्यातील एका कार्यक्रमात त्यांनी आपण सीडी लवकरच लावणार असं विधानं करुन विरोधकांची झोप उडवली आहे.

भोसरी जमीन खरेदी प्रकरणामुळे खडसे अडचणीत आले. त्यांची तपास यंत्रणांनी चैाकशीही केली. एकनाथ खडसे (Eknath Khadse) सध्या राष्ट्रवादीत (NCP) आहेत. राष्ट्रवादी गेल्यानंतरही खडसेंचा भाजप नेत्यांवर हल्लाबोल सुरुच आहे. विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि खडसे यांचे शाब्दीक युद्ध जगजाहीर आहे. ''भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माझी माझी ईडीची चौकशी लावली हे चंद्रकांतदादांनी मान्य केल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे,'' असा टोलाही खडसेंनी यापूर्वी लगावला आहे.

खडसेंकडे असलेल्या सीडीत नेमकं काय आहे, ते त्यांच्याशिवाय कुणालाच माहित नाही. या सीडीबाबत अनेक जणांना उत्सुकता आहे. ''माझी सीडी नक्की येणार आहे. आता काढून काय निवडणुकीवर परिणाम होणार नाही. वाट बघा,'' असं सूचक विधान खडसे यांनी शुक्रवारी पुण्यात केलं त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रात राजकारण खडसें खळबळ उडवून देणार का, असा प्रश्न विचारला जात आहे. त्यांनी यावेळी देवेंद्र फडणवीस यांचा चांगलाच समाचार घेतला.

''देवेंद्र फडणवीस जर गोव्यात बसून महाराष्ट्र हे मद्य राष्ट्र होईल असं म्हणत असतील तर गोव्यात दारूबंदी होईल. भाजपचा कार्यकर्ता दारू पिणार नाही. भाजपची वाईनच्या बाबतीत दुटप्पी भूमिका आहे. ती त्यांनी जाहीर करावी. महाराष्ट्रात वाईनला विरोध करायचा आणि मध्य प्रदेशात बिअर विक्रीला परवानगी द्यायची. गोव्यात गल्ली गल्लीत दारू मिळते. मध्यप्रदेश हा मद्य प्रदेश केलाय. देवेंद्र फडणवीसांनी गोव्यात दारू विकणार नाही, असं जाहीर करावं असं आव्हान देतो. त्यांनी जाहीरनाम्यात हा मुद्दा टाकावा म्हणजे त्यांची भूमिका समोर येईल,” असा टोला एकनाथ खडसे यांनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT