जालना : जालना (Jalna)अँटी करप्शन ब्युरोचे पोलीस निरीक्षक दोन दिवसांपासून अचानक बेपत्ता झाले आहेत. 2 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ही घटना घडली. संग्राम ताटे असे या पोलीस निरीक्षकांचं नाव आहे.
या घटनेमुळे जालना शहरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी संग्राम ताटे यांच्या पत्नीच्या फिर्यादीवरून कदीम जालना पोलिस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आली आहे. ( ACB Police Inspector Sangram Tate missing)
2 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजता ताटे हे मित्राला भेटायला चाललो असं पत्नीला सांगून यशवंतनगर येथील त्यांच्या घरातून बाहेर पडले. यावेळी त्यांनी मोबाईल, गाडी, सोबत नेले नाही. दरम्यान ताटे हे दोन दिवसांपासून घरी न परतल्यानं त्यांच्या पत्नीने कदीम जालना पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल केली आहे. पोलिसांनी त्यांची शोधाशोध सुरु केली.
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे औरंगाबादचे पोलीस अधीक्षक राहुल खाडे यांनी ही त्यांची दिवसभर जालना शहरात शोधाशोध केली, मात्र त्यांचा पत्ता लागत नसल्याने एसीबी, पोलीस प्रशासनात एकच खबबळ उडाली आहे.
संग्राम ताटे यांना बुधवारीच पोलिस निरीक्षक पदावर पदोन्नती मिळाली होती, व त्यांची कोकण विभागात पदोन्नतीवर बदली ही झाली होती. ज्या ठिकाणी संग्राम ताटे हे गेले होते त्या ठिकाणचे आणि त्याच्या आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.