Eknath Shinde : Amit Shah
Eknath Shinde : Amit Shah Sarkarnama
पुणे

Eknath Shinde : शिवरायांच्या इतिहासावर अमित शाह लिहणार पुस्तक : शिंदेंनी केले जाहीर!

सरकारनामा ब्यूरो

Amit Shah In Pune : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हे दोन दिवसीय पुणे दौऱ्यावर आले आहेत. कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्याचा हा पुणे दौरा महत्वाचा मानला जात आहे. तसेच या दौऱ्यादरम्यान त्यांनी विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावली. मोदी अॅट 20 या कार्यक्रमात शाह यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शाहंचे कौतुक केले. तसेच शाह हे शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे जाणकर असल्याचे सांगितले.

एकनाथ शिंदे म्हणाले, "अमित शहा हे शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे मोठे जाणकार आणि विद्वान आहेत. ते शिवप्रेमी आहेत. खूप लोकांना माहिती नसेल, पण शिवाजी महाराज आणि मराठ्यांच्या इतिहासाचा शाह यांनी अभ्यास केलेला आहे. याबाबत सखोल माहिती शाह यांना आहे," असे शिंदें म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, "शिवाजी महाराज आणि मराठांच्या इतिहासावर शाह हे पुस्तक लिहणार आहेत. हे पुस्तक लवकरच प्रकाशित करण्यात येणार आहे. आणि यात विशेष गोष्ट ही आहे की, हे पुस्तक लिहण्यासाठी पुरावे म्हणून लंडन मधून काही सामग्री,दस्तऐवज इथे आणण्याचा मानस शाह यांनी केला आहे."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT