Eknath Shinde | Uddhav Thackeray | Devendra Fadnavis Sarkarnama
पुणे

Junnar Panchyat Samiti: जुन्नरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेची मोठी खेळी; एका मतासाठी थेट उपसभापतीपदाची ऑफर; NCP नेही प्लॅन बदलला

Pune Politics: पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या अध्यक्ष आणि सभापती नियुक्तीचा आता मुहूर्त ठरला आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला असून बहुमताची सूत्र जुळवण्यात सर्वच राजकीय पक्षांनी सुरुवात केली आहे.

Sudesh Mitkar

Pune News: पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या अध्यक्ष आणि सभापती नियुक्तीचा आता मुहूर्त ठरला आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला असून बहुमताची सूत्र जुळवण्यात सर्वच राजकीय पक्षांनी सुरुवात केली आहे. जुन्नर पंचायत समिती सभापती-उपसभापती निवडीच्या हालचालीनं वेग घेतला असून या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं आपली सत्ता आणण्यासाठी समीकरण जुळवण्यास सुरुवात केली आहे.

जुन्नर पंचायत समितीचा विचार केला, तर या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आठ सदस्य आहेत. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा आणि ठाकरे सेनेचा एक व भाजपाचा एक सदस्य आहे. या ठिकाणी बहुमतासाठी आठ सदस्यांचा पाठिंबा गरजेचा असल्यानं शिवसेनेला बहुमत गाठण्यासाठी एक मताची गरज आहे.

त्यामुळे हे एक मत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा असणार की भाजपचं हे पाहणं महत्त्वाचं ठरत असतानाच जो सदस्य शिवसेनेला पाठिंबा देऊन आपलं एक मध्ये येईल त्याला उपसभापती पद येण्याचा आश्वासन शिवसेनेकडून दिला असल्याचं बोललं जात आहे.

तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस देखील या ठिकाणी गेम पलटवण्याच्या तयारीत आहे.जुन्नर पंचायत समितीची सदस्यांची संख्या 16 असून, 8 सदस्य शिवसेनेचे आहेत. राष्ट्रवादी काँग््रेासचे 6 सदस्य आहेत. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिल्यास ही आघाडी 8 सदस्यांपर्यंत पोहोचू शकते. अशावेळी समसमान मतं झाल्यास चिठ्ठीतून सभापती पद निवडण्याची शक्यता आहे.

सध्याच्या पक्षीय समीकरणांनुसार, शिवसेनेच्या कमल शेळकंदे यांच्या सभापतीपदावर विराजमान होण्याची शक्यता दिसून येत आहे. सभापती होण्यासाठी शिवसेनेला फक्त एकाच मताची गरज आहे. या पार्श्वभूमीवर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे आमदार अमित ढोले आणि भारतीय जनता पक्षाचे संजय वऱ्हाडी यांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न आमदार शरद सोनवणे यांच्याकडून सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, शिवसेना (उबाठा) गटाचे सदस्य अमित ढोले यांना पक्ष नेतृत्वाकडून स्पष्ट आदेश देण्यात आला आहे की, कोणत्याही परिस्थितीत एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेला पाठिंबा देऊ नये. यामुळे सभापती निवडीसाठी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेकडून मदत मिळणे अशक्य झाले आहे.

आता त्यांना भारतीय जनता पक्ष (भाजपा) च्या एकमेव सदस्याची मनधरणी करावी लागणार आहे. जर भाजपाने सहकार्य केले, तर त्यांच्या सदस्याला उपसभापती पद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अतुल बेनके यांनी सभापती व उपसभापती पदांच्या निवडीसाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीने आपल्या गटाचे नेते म्हणून संभाजी चव्हाण यांची निवड केली असून, शिवसेना (शिंदे गटाने) गटप्रमुख म्हणून जयसिंग पोटे यांची नेमणूक केली आहे.

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला भाजपा आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला यांच्या सदस्यांचा पाठिंबा मिळाला तरच पुढील गणित सोपे होईल. एकनाथ शिंदे शिवसेनेला बहुमतासाठी फक्त एकाच अतिरिक्त मताची आवश्यकता आहे, तर राष्ट्रवादी ला मात्र तीन सदस्यांच्या पाठिंब्याची गरज आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT