Ajit Pawar Accident: मोठी बातमी: अजितदादांच्या विमान अपघाताचा 'डीजीसीए'चा 22 पानांचा प्राथमिक अहवाल समोर

Ajit Pawar Airplane Accident: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित पवार यांच्या बारामती विमानतळावर झालेल्या दुर्घटनेप्रकरणी शनिवारी (ता.28) डीजीसीएकडून पहिला प्राथमिक अहवाल समोर आला आहे. या अहवालाकडे सर्वांचेच लक्ष लागलेले होते.
Ajit Pawar Death News in Marathi
Ajit Pawar Death News in MarathiSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News: राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला एक महिना पूर्ण झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती विमानतळाजवळ 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी भीषण विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता. मुंबईहून येताना लँडिंगदरम्यान चार्टर्ड विमानाचा अपघात झाला, ज्यात अजित पवारांसह विमानातील 5 जणांचा जागीच मृत्यू झाला होता. या अपघाताबाबत अनेक दावे-प्रतिदावे केले जात आहेत. पण आता या दादांच्या अपघाताबाबतचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित पवार यांच्या बारामती विमानतळावर झालेल्या दुर्घटनेप्रकरणी शनिवारी (ता.28) डीजीसीएकडून पहिला प्राथमिक अहवाल समोर आला आहे. या अहवालात काही धक्कादायक माहिती समोर येत आहे. या अहवालात अजितदादांचं विमान हे पहिल्यांदा झाडाला धडकलं नंतर खाली कोसळल्याचं म्हटलं आहे.

तसेच उष्णतेमुळे विमानाचा प्लाईट डेटा रेकॉर्डर खराब झाल्याचा उल्लेख प्राधिकरणाच्या अहवालात करण्यात आला आहे. विमान कोसळलं तेव्हा २ हजार मीटर दृष्यमानता होती. सकाळी 8 वाजून 46 मिनिटांनी विमान क्रॅश झालं. रनवेच्या सुरुवातीला 50 मीटर बाहेर विमान कोसळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

तसेच दोन्ही वैमानिकांच्या ब्रेथ अ‍ॅनालायझर टेस्ट निगेटिव्ह आल्याचंही डीजीसीएच्या प्राथमिक अहवालात समोर आलं आहे. या दुर्घटनेप्रकरणी रॉ डेटा डाऊनलोड करण्यात आल्याचंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

Ajit Pawar Death News in Marathi
Fadnavis Government: फडणवीस सरकारकडून IAS अधिकाऱ्यानंतर 24 तासांच्या आतच सहाय्यक धर्मादाय आयुक्तांचं तडकाफडकी निलंबन,विदर्भ प्रशासनात खळबळ

बारामती विमानतळावर झालेल्या दुर्घटनेत अजित पवार यांचा दुर्दैवी निधन झालं होतं. त्यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली होती. जिल्हा परिषदा आणि पंचायत समितींच्या निवडणुकांच्या तोंडावरच झालेल्या अजितदादांचं निधन झालं होतं. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली होती. या दुर्घटनेचा सखोल तपास DGCA आणि सीआयडीमार्फत सुरू आहे.

अजितदादांच्या विमान दुर्घटनेनंतर व्हिएसआर कंपनीवर गंभीर आरोप करण्यात आले होते. यानंतर डीजीसीएनं या आरोपांची गंभीर दखल घेत आता व्हिएसआर कंपनीवर मोठी कारवाई केली आहे. यात डीजीसीएनं व्हिएसआर विमान कंपनीवर नियमांचं पालन होईपर्यंत उड्डाणावर बंदी घातली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com