Pune BJP
Pune BJP  Sarkarnama
पुणे

Pune News: चंद्रकांतदादांच्या मतदारसंघात भाजपच्या माजी नगरसेवकाची मेट्रो पिलरवर फ्लेक्सबाजी

सरकारनामा ब्यूरो

Pune : पुण्यातील भाजपच्या माजी नगरसेवकाने वाढदिवसाचे फ्लेक्स चक्क मेट्रोच्या पिलरवरच लावले आहेत. एक-दोन नव्हे तर तब्बल वीस पेक्षा जास्त फ्लेक्स मेट्रोच्या पिलरवर लावण्यात आले आहेत. बावधन परिसरातील भाजपच्या एका माजी नगरसेवकाच्या वाढदिवसानिमित्त हे फ्लेक्स लावण्यात आले आहेत.

मेट्रोच्या पिलरवर कोणत्याही प्रकारची पोस्टरबाजी करण्यास मनाई आहे. मात्र असे असतानाही कोथरुड परिसरात सर्व मेट्रोच्या पिलरवर वाढदिवसाचे फ्लेक्स लावण्यात आलेत. त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. तर आता यावर महापालिका प्रशासन काय कारवाई करणार? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

महापालिकेच्या नियमानुसार, असे कुठेही फ्लेक्स लावण्याला परवानगी नसते. जर असे फ्लेक्स लावायचे असल्यास त्यासाठी परवानगी अवश्यक असते. मात्र सर्व मेट्रोच्या पिलरवर हे वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेले फ्लेक्स नेमकी कुणाच्या वरदहस्ताने लावण्यात आले? असा सवाल आता उपस्थित करण्यात येत आहे.

दरम्यान, ज्या भागात ही फ्लेक्सबाजी करण्यात आली आहे. तो मतदार संघ भाजपचे नेते आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांचा आहे. असं असतानाही भाजपच्याच माजी नगरसेवकाकडून ही फ्लेक्सबाजी करण्यात आली आहे. त्यामुळे शहराचे अशा प्रकारे विद्रुपीकरण करणं कितपत योग्य आहे? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक करत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT