Shivsena : आढळराव लागले कामाला; ठाकरे गटाचा करेक्ट कार्यक्रम करत घडवून आणला शेकडो महिलांचा प्रवेश

Balasahebanchi Shivsena : पुणे जिल्ह्यात शिंदे गटाची ताकद वाढली
Balasahebanchi Shivsena
Balasahebanchi Shivsena Sarkarnama

पिंपरी : बाळासाहेबांच्या शिवसेनेत शिरूर लोकसभा मतदारसंघात आणि त्यातही शिरूर तालुक्यातून इनकमिंग सुरुच आहे. शिरूरचे माजी खासदार आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव-पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांच्या लांडेवाडी, मंचर (ता.आंबेगाव) येथील निवासस्थानी जनता दरबारात काल (ता.८) शिरूर तालुक्यातील ३९ गावातील शेकडो महिलांनी शिंदे गटात प्रवेश केला.

२५ डिसेंबरला आढळरावांच्या याच जनता दरबारात शिरूर तालुक्यातील १५० महिलांनी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला होता. तर त्याच दिवशी पुणे जिल्ह्यातील बाळासाहेबांच्या शिवसेनेचे दुसरे उपनेते आणि मावळचे खासदार श्रीरंग बारणे (Srirang Barne) यांच्या मतदारसंघातही तीस महिलांचा बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश झाला होता.

त्यानंतर नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी माजी नगरसेवक प्रकाश मलशेट्टी, उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते दिलीप कुसाळकर यांच्यासह उद्योगनगरीतील १०० हून अधिक कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. या इनकमिंगमुळे शिंदे गटाची ताकद जिल्ह्यात वाढत चालली आहे.

Balasahebanchi Shivsena
Congress : पुणे काँग्रेसचे कोण होणार अध्यक्ष; शिंदे, किराड की बहिरट?

राज्य शासनाची ताकद आपल्या पाठीशी असून मी शिरूर तालुक्यातील विकासकामे तसेच नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे कालच्या प्रवेशावेळी आढळरावांनी सांगितले. या भागातील संघटित महिला आणि त्यांच्या बचत गटांसाठी राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून योजना राबविल्या जातील, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

यावेळी बाळासाहेबांच्या शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अनिल काशीद, शिरूर तालुकाप्रमुख रामभाऊ सासवडे, युवासेना जिल्हाधिकारी बापूसाहेब शिंदे आदी उपस्थित होते. यावेळी पदाधिकाऱ्यांना विविध पक्षीय जबाबदाऱ्यांचे वाटपही करण्यात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com