Raju Shetti

 

Sarkarnama

पुणे

‘एफआरपीची मोडतोड करणाऱ्या कारखान्यांना १५ टक्के व्याज द्यावे लागणार

चालू गळीत हंगामात कोल्हापूर जिल्हा वगळता राज्यातील बहुतांश साखर कारखान्यांनी बेकायदेशीररित्या ‘एफआरपी’चे तुकडे केलेले आहेत.

सरकारनामा ब्यूरो

पुणे : राज्यातील ज्या साखर कारखान्यांनी ‘एफआरपी’ची (FRP) मोडतोड केलेली आहे, त्या साखर कारखान्यांना १५ टक्के व्याजासहित ‘एफआरपी’ द्यावी लागेल, असे स्पष्ट करत ‘एफआरपी’ मोडणाऱ्या कारखान्यांवर त्वरीत कारवाई करू, असे आश्वासन साखर आयुक्त शेखर गायकवाड (Shekhar Gaikwad) यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांना दिले.

चालू गळीत हंगामात कोल्हापूर जिल्हा वगळता राज्यातील बहुतांश साखर कारखान्यांनी बेकायदेशीर रित्या ‘एफआरपी’चे तुकडे केलेले आहेत. तसेच इथेनॉल निर्मितीमुळे अनेक साखर कारखान्यांची साखर उतारा कमी झाला आहे. याचा परिणाम उसाच्या 'एफआरपी'वर झाला आहे. यासंदर्भात राजू शेट्टी यांनी आज पुणे येथील कार्यालयात साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची भेट घेऊन मागण्या मांडल्या.

यावेळी बोलताना शेट्टी म्हणाले,‘‘ कोल्हापूर जिल्हा वगळता राज्यातील अनेक साखर कारखान्यांनी एफआरपीची मोडतोड केली आहे. त्यांच्यावर त्वरीत 'आरआरसी'ची कारवाई करण्यात यावी. त्या शेतकऱ्यांना व्याजासहित पैसे वसूल करून द्यावेत.राज्यात अनेक साखर कारखान्यांनी ऊसाच्या रसापासून थेट मोलॅसीस,इथेनॉलची निर्मिती सुरू केली आहे. त्यामुळे साखर कारखान्यांचा उतारा कमी झाला आहे. संबंधित साखर कारखान्यांची यादी प्रकाशित करण्यात यावी. जेणेकरून शेतकऱ्यांना वाढीव एफआरपी मिळू शकेल.

या संदर्भात साखर आयुक्त शेखर गायकवाड म्हणाले, ‘‘ज्या साखर कारखान्यांनी एफआरपीची तुकडे केले आहेत. त्या कारखान्यांना 15 टक्के व्याजासहित उर्वरीत एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना द्यावीच लागेल. संबधित सर्व शेतकऱ्यांनी तक्रारी कराव्यात. त्यांचे पैसे व्याजासहित वसूल करून देऊ. तसेच ऊसाच्या रसापासून ‘बी हेवी मोलॅसीस’ व इथेनॉल निर्मिती केलेल्या साखर कारखान्यांची यादी तयार करण्याचे काम सुरू असून लवकरच ती यादी शेट्टी यांना दिली जाईल.’’

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT