Accused posing as a fake OSD being taken into custody by Pune Police in an impersonation case, highlighting strict police action. Sarkarnama
पुणे

Eknath Shinde Fake OSD : "मी एकनाथ शिंदेंचा OSD, गुन्ह्याचा तपास नीट करा..."; म्हणणाऱ्याची पुणे पोलिसांनी काढली हवा

Eknath Shinde's fake OSD arrest : पुण्याचे पोलीस उपायुक्तांची दिशाभूल करणाऱ्या आरोपी प्रद्युम्न श्रीहरी पाटील याला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पाटील याच्या विरोधात पुण्यातील विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता कलम 204 अंतर्गत गुन्हा दाखल करत त्याच्या विरोधात पोलिसांनी अटकेची कारवाई केली आहे.

Sudesh Mitkar

Pune News, 02 Apr : एक गृहस्थ तावातवात आले आणि थेट पोलीस उपायुक्तांच्या समोर खुर्चीवर बसून 'तुम्हाला गुन्ह्यामध्ये नीट तपास करता येत नाही', अशी चढ्या आवाजात विचारणा करू लागले. तसेच मी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ओएसडी असल्याचे त्याचे त्यांनी पोलीस उपायुक्तांना सांगितले.

उपमुख्यमंत्र्यांचे थेट ओएसडी एखाद्या गुन्ह्याबाबत माहिती घेत आहेत, असं समजून सुरुवातीला पोलीस उपायुक्तांनी त्यांना काही प्रमाणात एंटरटेन केलं आणि या कोणत्या गुन्ह्याबाबत समस्या आहे हे जाणून घेतलं.

मात्र पुढील व्यक्तीचा अविर्भाव आणि सुरू असलेल्या त्याच्या हालचाली पोलिसांच्या नजरेतून सुटल्या नाहीत. यानंतर पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले यांनी तातडीने याची खातर जमा करत आरोपी प्रद्युम पाटील हा खरंच उपमुख्यमंत्री शिंदेंचे ओएसडी आहेत का? याची माहिती घेतली असता तो तोतयागिरी करताना आढळून आला.

त्यानंतर पोलीस उपयुक्त त्यांची दिशाभूल करणाऱ्या आरोपीला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आरोपीचे नाव प्रद्युम्न श्रीहरी पाटील असून वय 47 आणि तो राहणार हिंजवडी येथील आहे. पाटील याच्या विरोधात पुण्यातील विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता कलम 204 अंतर्गत गुन्हा दाखल करत त्याच्या विरोधात पोलिसांनी अटकेची कारवाई केली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आरोपी प्रद्युम्न याने पुण्यातील परिमंडल 1 पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले यांच्या कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही एका गुन्ह्यांमध्ये तपास व्यवस्थित केला नाही. असं सांगत मी उपमुख्यमंत्र्याचा ओएसडी आहे असे सांगून त्यांच्यावर दबाव टाकत दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला असल्याचे समोर आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT