Ashok Kharat Case: खरात प्रकरणात ट्विस्ट! अजय मिश्रा यांच्या नकारानंतर ठाकरेंचे वकील सरकारची बाजू मांडणार?

Aseem Sarode Wants to Act as Govt Lawyer in Ashok Kharat Case:नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरणात उद्धव ठाकरे यांचे वकील असीम सरोदे यांनी सरकारी वकील म्हणून खटला चालवण्याची इच्छा व्यक्त केली.
Ashok Kharat
Ashok Kharat Sarkarnama
Published on
Updated on

Pune News: नाशिक येथील भोंदू अशोक खरात प्रकरणात न्यायालयीन लढाई बाबत मोठी अपडेट समोर येत आहे. या खटल्याची बाजू मांडण्यासाठी विशेष तपास पथकाने ज्येष्ठ विधीज्ञ व विशेष सरकारी वकील ॲड.अजय मिसर यांची नियुक्ती करण्याची विनंती केली होती.

ॲड. मिसर यांनी कामाच्या अतिरिक्त ताण असल्याचे कारण देत हा खटला लढवण्यास असमर्थता दर्शवली आहे. याबाबत त्यांनी लेखी पत्रही पाठवले आहे. त्यानंतर शिवसेना पक्ष कोणाचा याबाबत सुरू असलेल्या सुप्रीम कोर्टामधील न्यायालयीन लढ्यात उद्धव ठाकरे यांची बाजू मांडणारे वकील असीम सरोदे हे पुढे आले आहेत. त्यांनी सरकारी वकील म्हणून या खटला लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

सध्या ॲड.अजय मिसर हे राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय अनेक महत्त्वाच्या खटल्यांमध्ये सरकारची बाजू यशस्वीरीत्या मांडत आहेत. यात २०११ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणाशी संबंधित कुख्यात गँगस्टर रवी पुजारी यांच्याविरोधातील महाराष्ट्रातील सर्व खटले आणि इतर अनेक गंभीर न्यायालयीन खटल्यांची चौकशी त्यांनी केली होती. या सर्व प्रकरणांना पुरेसा वेळ देणे गरजेचे असल्याने अशोक खरात प्रकरणासाठी वेळ काढणे शक्य नसल्याचे त्यांनी SIT ला पाठवलेल्या पत्रात स्पष्टपणे नमूद केले आहे.

Ashok Kharat
Ashok Kharat Case: कोर्टात 7 मिनिटात काय घडलं? SIT खरातचा फिरवणार गेम; 'प्लॅन बी' तयार

या सर्व घडामोडीनंतर असीम सरोदे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे.ज्यामध्ये म्हटला आहे की, भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात सरकारी वकील म्हणून जबाबदारी घेण्यासाठी कुणी मिळत नाहीये ही बातमी वाचली. आमचे मित्र अजय मिसार सरकारतर्फे महाराष्ट्रातील अनेक केसेसमध्ये व्यग्र असल्याने असेल कदाचित त्यांनी खरात केसमध्ये सरकारी वकील म्हणून जबाबदारी घेण्यास नकार दिला आहे.

Ashok Kharat
Rupali Chakankar News: चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर फार्महाऊसवर 'मुळशी पॅटर्न' जंगी पार्टी ? एका 'स्टेटस'मुळे फुटलं बिंग

'वैसे तो मै बहोत प्रभावित हु आपसे' फेम एकमेव विशेष म्हणून स्वतःला प्रस्थापित केलेले महोदय दिल्ली सभेत जाऊन बसले. पण तरीही मीच विशेष सरकारी वकील म्हणून केसेस चालविणार असा त्यांचा हट्ट असतो. त्यांना सरकारने विचारून बघावे. ते कायदा व फायदा दोन्ही बाजूंनी विचार करू शकतात, असे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे उज्वल निकम यांच्यावर निशाणा साधला.

खरात सारख्या भोंदू बाबालाच नाही तर अश्या प्रवृत्ती नेस्तनाबूत करायच्या असतील तर खरात विरोधातील या केसमध्ये 'विशेष सरकारी वकील' म्हणून काम करण्याची माझी तयारी आहे. असं असीम सरोदे म्हणाले.

Ashok Kharat
Pune ZP News: सभापती निवडी आधीच वाद पेटला! ZP सदस्य केवळ ‘नावापुरते’; राष्ट्रवादीमध्ये नाराजी

'राज्याचे धोरण'

विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्याचे राजकारण आहे. कुणी काही नेमकेपणाने बोलले कि लगेच 'यात राजकारण आणू नका' म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या मनात जे राजकारण असेल त्यालाच 'राज्याचे धोरण' म्हणण्याचा प्रघात आहे. अशी टीका देखील त्यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com