FDA officials inspect food establishments during a city-wide drive in Pune, resulting in the closure of 20 hotels over alleged food safety and hygiene violations. sarkarnama
पुणे

​FDA Action : पुण्यात FDA चा ‘सर्जिकल स्ट्राईक! तडकाफडकी बंद केली 'ही' 21 हॉटेल्स!

Pune 20 Hotels Shut : तपासणी दरम्यान हाॅटेल्समध्ये अत्यंत भीषण अस्वच्छता, अन्न सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवणे, तसेच परवान्यांच्या अटींचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले.

Sudesh Mitkar

Pune News : पुणे विभागात अन्न व औषध प्रशासनाने अस्वच्छता आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात जोरदार धडक मोहीम उघडली आहे. 'सेफ फूड, सेफ ईट, सेफ महाराष्ट्र' या अभियानांतर्गत प्रशासनाने धडक कारवाई करत पुणे विभागातील तब्बल २१ हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि बेकऱ्यांचे परवाने थेट निलंबित केले आहेत. प्रशासनाच्या या आक्रमक भूमिकेमुळे हॉटेल व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार पुणे विभागातील विविध हॉटेल, बेकरी आणि रेस्टॉरंट्सची अचानक तपासणी करण्यात आली. या तपासणी दरम्यान अनेक ठिकाणी अत्यंत भीषण अस्वच्छता, अन्न सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवणे, तसेच परवान्यांच्या अटींचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले. प्रशासनाने कोणत्याही प्रकारची शिथिलता न दाखवता तात्काळ २१ आस्थापनांचे परवाने निलंबित करण्याचा धडाका लावला आहे.

या प्रमुख आस्थापनांवर हातोडा

निलंबनाची कारवाई झालेल्या प्रमुख हॉटेल्स व बेकऱ्यांमध्ये पुणे शहर व परिसरातील 'न्यु सम्राट हॉटेल', 'हॉटेल केसर' (लोणावळा), 'इंटीग्रेटेड फूड सर्व्हिसेस' (बालेवाडी), 'क्रिमलाईट कन्फेक्शनर्स' (लोहगाव व विमाननगर), 'हॉटेल ताजमहाल' (प्रभात रोड), 'संस्कृती फुड्स' (कोरडेवाडी, जुन्नर), 'स्वीकार्स ई एन्ड टी प्रा. लि.' (मिलिंद रोड), 'मे. माधव डेअरी' (मंगळवार पेठ), 'मदिना फॅमिली रेस्टॉरंट' (भवानी पेठ) आणि 'शिव डेअरी व इंडियन बेकरी' (पुणे).

सातारा, सांगलीत, कोल्हापूरमध्ये कारवाई

सातारा, सांगली परिसरातील 'हॉटेल लक्ष्मी गार्डन फॅमिली रेस्टॉरंट' (शिरढोण, जि. सांगली), 'मे. मेरी कॉर्नर रेस्टॉरंट' (ईश्वरपूर, जि. सांगली), 'हॉटेल १२२०' (कवठे महांकाळ).

कोल्हापूर परिसर: 'श्रीकृष्ण बेकरी' (शिरोली), 'आयेशा बेकरी' (इचलकरंजी), 'बंगलोर अय्यंगार बेकरी' (कराड), 'डायमंड बेकरी' (विक्रम नगर) आणि 'केदारलिंग बेकरी' (रांकाळा).

कारवाई सुरूच राहणार...

या कारवाईबाबत अन्न व औषध प्रशासन, पुणे विभागाचे सहआयुक्त दि. वा. भोसले यांनी सांगितले अन्न सुरक्षेचे नियम न पाळणाऱ्यांवर प्रशासनाकडून यापुढेही अत्यंत कठोर कारवाई सुरूच राहणार आहे. सर्व खाद्यपदार्थ व्यावसायिकांनी ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ न करता स्वच्छतेचे नियम पाळावेत. नियमांचे उल्लंघन आढळल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT